अभिनेते अरुण नलावडेंच्या हस्ते ‘दिवे लागणीच्या वेळी’ काव्यसंग्रह प्रकाशित


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘दिवे लागणीच्या वेळी’ या ग्रंथाली प्रकाशित आणि श्री जगदीश आचरेकर लिखित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. एमआयजी क्लब, बांद्रा येथे हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते श्री अरुण नलावडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष श्री विजय पाटील आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलासपूरकर हे उपस्थित होते. आपल्या कारकुनी आयुष्यात घडलेल्या पेच प्रसंगांचा अनुभव या कवितेच्या माध्यमातून जगदीश आचरेकर यांनी मांडल्या आहेत.

जगदीश आचरेकर यांचा कविता आणि लेखन यांच्याशी काहीच संबंध नव्हता. पण २०१८ मध्ये त्यांनी पहिली कविता लिहिली. स्वतःच्या मित्र मंडळी आणि घरच्यांनी केलेली टीका टिपण्णीने त्यांनी आपलं कविता लेखन जोपासलं. या जोपासलेल्या कविताचा संग्रह म्हणजे ‘दिवे लागणीच्या वेळी’. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रेक्षकांना संबोधित करताना विजय पाटील यांनी, घरी आईमुळे झालेल्या मराठी भाषेच्या संस्काराचा आवर्जून उल्लेख केला. लहान असताना अशाच कविता आणि कथांनी त्यांचं बालपण कस बहरलं याविषयी ते व्यक्त झाले. तर अभिनेते अरुण नलावडे यांनी काव्यसंग्रहाचे प्रकाशन आपल्या हस्ते होत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच कवितांमुळे मराठी साहित्य कसे प्रगल्भ होत आले, याविषयीदेखील सांगितले.

यावेळी जगदीश आचरेकर यांनी अत्यंत भावविवश शब्दांत आपले मनोगत मांडताना सर्व स्नेहयांविषयी आत्मीयता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथाली विश्वस्त डॉ. लतिका भानुशाली यांनी केले. या प्रसंगी श्रीपाद हळबे, डॉ. पी. व्ही. शेट्टी, अजिंक्य नाईक, नवीन शेट्टी, रवी मांद्रेकर, रत्नाकर शेट्टी, गोपाल कोळी, नदीम मेनन, प्रवीण बर्वे, ओमकार मालडीकर, संदीप विचारे, शाह आलम शेख, अरमान मलिक, अभय हडप, मंगेश साटम, श्रीकांत तिगडी, खोदादाद येझगिरी, प्रमोद यादव, गौरव पयाडे इत्यादि मान्यवरांचा खास सत्कार या प्रसंगी करण्यात आला.