Ashok Saraf And Nivedita Saraf | महिला आश्रमात ‘अशाप्रकारे’ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ साजरी करतात दिवाळी


Ashok Saraf And Nivedita Saraf |दिवाळी हा आपल्या भारतातील मुख्य सण आहे. या सणाला सगळीकडे रोषणाई पसरलेली असते. तसेच दिवाळीला दिव्यांचा सण असे देखील म्हटले जाते. या काळात सगळे नातेवाईक जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. आणि हा सण साजरा करतात अगदी सामान्यांपासून कलाकारांच्या घरी देखील अशाच पद्धतीने दिवाळी साजरी होत असते. परंतु ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता स्वरा हे मात्र एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांची दिवाळी साजरी करतात.

निवेदिता सराफ यांना त्या दिवाळी कशी साजरी करतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्या दरवर्षी महिला श्रम आणि अंध मुलांसाठी आवर्जून फराळ पाठवतात आणि त्यांचे दिवाळी साजरी करतात असे सांगितले.

हेही वाचा- 27 वर्षांचा याराना!! किरण मानेंनी शेअर केली दोस्तासाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘शेवटच्या श्वासापर्यन्त आसंल..’

यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “आम्ही लहान असताना आई खाजाचे कानवले, लाडू, चिवडा, फराळ असे स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळेस सासरचे लोक माझ्या घरी येतात. आणि आम्ही सगळे मिळून जेवतो. यावर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत. तरी मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात. माझा मुलगा अनिकेत गेले काही वर्षापासून दूर आहे. मुलांशिवाय सण साजरी करणे रिकामे वाटते. पण आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल करतो आणि एकत्र दिवाळी फराळ खातो.”

पुढे त्या म्हणाल्या की, “मी अनिकेतला दरवर्षी फराळ पाठवते. तसेच मी आणि अशोक आम्ही दोघे श्रद्धा नंदा महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलांना दिवाळीच्या फराळाचे देखील वाटप करतो. जे घरापासून दूर आहेत त्यांना एकटे वाटू नये त्यामुळे आम्ही हा दिवाळीचा फराळ त्यांना देतो.”

खरं तर त्यांच्या या दिवाळीबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. परंतु त्यांनी आता या गोष्टी सांगितल्या आहेत. निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये काम करत आहेत.