का..? कशासाठी..?; जालना लाठीचार्ज प्रकरणी अश्विनी महांगडेने व्यक्त केला संताप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. अश्विनी केवळ अभिनेत्री नव्हे तर एक समाजसेविका म्हणून देखील कार्यरत आहे. त्यामुळे ती कायम विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर थेट भाष्य करताना दिसते. दरम्यान नुकतीच शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ज्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. याविषयी अश्विनीनेदेखील संताप व्यक्त केला आहे.

जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शेअर केलेली पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि म्हणूनच तिने जालना लाठीचार्ज प्रकरणी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. तिने या इंस्टाग्राम स्टोरी पोस्टमध्ये संताप व्यक्त करत सवाल उठवला आहे कि, ‘मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज… का..? कशासाठी..?’

रिपोर्टनुसार, जालना येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. हे आमरण उपोषण सुटावे आणि उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावे यासाठी प्रशासनाने केलेल्या दोन चर्चांना काही यश आले नाही. यानंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सध्या विविध स्तरांवरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.