‘यात मी भाग होणे, माझे कर्तव्य….’; मराठा आरक्षण लढ्यात अश्विनी महांगडेचा सहभाग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा विषय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र या विषयवार बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय मंडळी, कलाकार मंडळी व्यक्त झाली आहेत.

दरम्यान ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील मराठा आंदोलन लढ्यात सहभागी झाली आहे. अश्विनी महांगडेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अश्विनीने मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन केले आहे. अश्विनीने साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना भेट दिल्यानंतर हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टसोबत तिने लिहिलेलं कॅप्शन प्रचंड चर्चेत आलं आहे.

अश्विनीने लिहिलं, ;आता नाही तर कधीच नाही……..
विद्यार्थी …
स्वप्नं…
मेहनत…
परीक्षा…
उत्तिर्ण….
यश…
तरीही अपयश…
मग आक्रोश…
यातना…
मग परत परीक्षा….
मग परत सगळे तेच आधीचे पाढे…
आणि मग आत्महत्या….
हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे’. अश्विनीची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून ‘जय शिवराय’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.