Ashwini Kasar |मुंबईमध्ये आपलं स्वतःचा हक्काचे एखाद घर असावे, असे सगळ्यांचीच इच्छा असते. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःची घर घेणे ही काही साधी गोष्ट नाही. आणि हेच स्वप्न आपल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा पूर्ण झालेली आहे. नाटक मालिका यांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी कासर हिने नवीन घर घेतले आहे. तिला म्हाडाची लॉटरी लागली आहे. तिने तिच्या वाढदिवशी सगळ्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केलेली आहे.
अभिनेत्री अश्विनीने ससोशल मीडिया अकाउंटवर नवीन घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करून दिले कॅप्शन दिलेले आहे की, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि आपण काम करतोय त्या शहरात हक्काचे स्वतःचे घर होणे हे एकतर स्वप्न आहे. किंवा कधीकाळी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगणित करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी हा शब्द प्रपंच…काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायची नाही. पण माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांनी मला माझ्या घराची उणीव कधीही जाणू दिली नाही.”
यापुढे अश्विनीने लिहिले की, “नुसतं घर नाही तर घरपण सुद्धा दिले. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि आपलं घर ते आपल्या घरी या भावनेभेटी मी बदलापूर गाठायचे… आज रात्री मी रात्री केलेले प्रवास तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय, आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय सगळं worth वाटते. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिलेली आहे.”
शेवटी अश्विनीने लिहिले की, “मुंबईने आपलं म्हटलं बुवा एकदाच असं काहीसं वाटतंय. माझा घर मिळवण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली. त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि महाराष्ट्र शासनाचे आभार तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असंच असू भावना समजून घ्याल याची खात्री आहे.”