Ashwini Mahangade | ‘अखेर देवांनी सांगावा धाडला’ आश्विनी महांगडेने सांगितला जेजुरी गडावरचा अनुभव


Ashwini Mahangade | मालिकांमधून कलाकार घराघरात पोहोचत असतात. असेच आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या पोस्टमधून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

नुकताच अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला गेलेली आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर खंडोबा दर्शनाचा भारावून टाकणारा अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा – ‘मर्डरवाले कुलकर्णी’ फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; रोमँटिक अंदाजात केली रिंग एक्सचेंज

अश्विनीने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. गेल्या वर्षी मन मंदिरा गजर भक्तीचा वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले. पण गडावर दर्शनासाठी जात आले नाही. मी जेव्हा तेथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच म्हणायचे की, देवाने अजून बोलावले का नाही? कधी योग येणार कधी दर्शन होणार? आणि देवांनी सांगावा धाडला दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण.”

तिचीही अश्विनीची ही पोस्ट ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओला प्रेम देत आहेत.

अश्विनी लवकरच तिच्या चाहत्यांना पुण्यश्लोक आहिल्याबाई या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील चालू आहे. हा सिनेमा 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.