हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून अनेक मराठी मालिका बंद होताना दिसत आहेत. याचे कारण टीआरपी आहे. काही मालिकांना टीआरपी उत्तम मिळत असला तरीही काही मालिका मात्र टीआरपीच्या रेसमध्ये कुठेतरी मागे पडत आहेत. परिणामी अगदी नवीन सुरु झालेल्या मालिकांनाही प्रेक्षकांचा वेळेआधीच निरोप घ्यावा लागत आहेत अलीकडच्या काळात अनेक मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये आता ‘कस्तुरी’ अन ‘योगोगेश्वर जय शंकर’ या मालिकांचाही समावेश झाला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील या दोन मालिका अचानक बंद करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि एक आध्यत्मिक मालिका असून याचा एक वेगळा चाहता वर्ग होता. शिवाय अद्याप मालिकेचा शेवट आला असल्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. असे असूनही ‘कलर्स मराठी’ वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला हे प्रेक्षकांना पटलेले नाही. ज्यामुळे प्रेक्षकांनी आपली नाराजी दर्शवत मालिकेच्या निर्मात्यांवर संतापाचे ताशेरे ओढले आहेत.
‘कलर्स मराठी’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर नाराजी व्यक्त करताना एका प्रेक्षकाने लिहीलं, ‘हे खूप चुकीचं आहे. ही काय डेली सोप नव्हती की टीआरपीमुळे मालिका बंद केली. नको त्या बकवास मालिका चालू ठेवल्यात. त्या नको त्या फालतू मालिकांमुळे वेळ पण बदलली. यावरून हेच कळतं की, कोणतीही वाहिनी असुदे या लोकांना फक्त पैशांची मतलब आहे आणि आपल्यासारखे लोक यांच्या मालिका बघून टीआरपी वाढवतो. यांचाच फायदा होतो. असं असेल तर कोणत्याच देवांच्या मालिका काढू नका.
देवाची मालिका काढायची या अशा वाहिन्यांची लायकीच नाही. परत असं करूही नका. कलर्स मराठी जाहीर निषेध’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘कलर्स टिव्ही मराठी व त्याचे वरीष्ठ अधिकारी यांचा जाहीर निषेध . लवकरच त्यांना आमच्या सदगुरू ची मालिका बंद केली याचे उत्तर व हिशोब द्यावाच लागेल . महाराष्ट्रातील शंकर बाबा चा भक्त शांत बसणार नाही याची त्यांनी नोंद घ्यावी . लवकरच परीणाम दिसेल नाद भयंकर जय शंकर’.