रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात भाषेचा आणि मनोरंजनाचा मोठा संबंध आहे. ज्या प्रेक्षकांची जी भाषा त्यामध्ये त्यांचे मनोरंजन करणे हि मोठी जबाबदारी कलाकारांवर असते. हि जबाबदारी प्रत्येक भाषेतील कलाकार व्यवस्थित पार पाडत असतात. अशातच पंख विस्तारात हे कलाकार इतर भाषांमध्ये काम करून त्यांचा चाहता वर्ग वाढवताना दिसतात. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी हिंदी तसेच दाक्षिणात्य … Read more

‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचा नुकताच वाढदिवस झाला. प्रार्थनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मंडळींनी विविध पोस्ट शेअर करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टचा समावेश आहे. यामध्ये कुशलने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान … Read more

‘एकदा येऊन तर बघा’नंतर प्रसाद खांडेकरकडून नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार कलाकार एकत्र दिसणार

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर फार लोकप्रिय आहे. अलीकडेच त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांनतर आता प्रसाद खांडेकरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल … Read more

‘मला जर एका पुरुषाची गरज..’; मराठी अभिनेत्री श्रुती मराठेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Shruti Marathe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राधा ही बावरी’ या मालिकेतून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेली अभिनेत्री श्रुती मराठे ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर सौंदर्यामुळे श्रुतीचे लाखों चाहते आहेत. मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमातून श्रुतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. मराठी, तमिळ, कन्नड, हिंदी भाषांमध्ये … Read more

स्वप्नपूर्ती!! माधुरी पवारने साताऱ्यात खरेदी केलं आलिशान घर; गृहप्रवेशाचा व्हिडीओ झाला व्हायरल

Madhuri Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनीं सौंदर्य, अदाकारी आणि नृत्य शैलीच्या आधारावर अनेकांचे मन जिंकले आहे. यांमध्ये एक म्हणजे ‘अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री माधुरी पवार. या कार्यक्रमाने माधुरी पवारला प्रकाशझोतात आणली. पुढे माधुरीने तिच्या अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून … Read more

भाऊचा नादखुळा!! सरोगसीवर भाष्य करत इंटरटेन्मेण्टची डिलिव्हरी करणार ‘डिलिव्हरी बॉय’; टिझर बघाच

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना ‘सरोगसी’साठी तयार करताना दिसत असून यातून … Read more

‘मुंबई मराठी माणसाच्याच बापाची..’; पुष्कर जोगने मांडलं रोखठोक मत

Pushkar Jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. ज्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमालीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘जबरदस्त’, ‘मिशन पॉसीबल’, ‘ती & ती’, ‘वेल डन बेबी’, ‘तमाशा LIVE’, ‘व्हिक्टोरिया’ हे त्याचे काही गाजलेले सिनेमे आहेत. याशिवाय पुष्कर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा व्यक्त … Read more

‘.. ती परत आलीये’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत काळ बनून भूतकाळ उभा राहणार

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या लोकप्रिय मालिकेचे नवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. जयदीप- गौरीच्या पुनर्जन्मात त्यांनी अधिराज- नित्या म्हणून जन्म घेतला असून ते एकमेकांसमोर आले आहेत. अनोळखी असूनही त्यांच्यातील ओळखीचे नटे त्यांना एकमेकांकडे ओढताना दिसत आहे. मालिकेतील काही जुन्या पात्रांनी निरोप घेतल्याने मालिकेतील मजा निघून जाईल … Read more

‘दादा एक गुडन्यूज आहे’ फेम अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत; ग्रहमख, मेहंदीचे फोटो व्हायरल

Hrishi Manohar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी गेल्या काही महिन्यांत लग्न बंधनात अडकली. यामध्ये सुरुची अडारकर- पियुष रानडे, प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन, गौतमी देशपांडे- स्वानंद तेंडुलकर, सोनल पवार- समीर पालूष्टे, स्वानंदी टिकेकर- आशिष कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. या लोकप्रिय जोडप्यांचा सुखी संसार सुरु झाल्यांनतर आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आले … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत सुरुची अडारकरची एंट्री; साकारणार ‘हि’ महत्वाची भूमिका

Suruchi Adarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील रहस्यांचा शोध मालिकेला सतत चर्चेत ठेवत असतो. सध्या या मालिकेत पंचपीटीका रहस्याचा शोध सुरू आहे. जो प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवतोय. मालिकेत रुपालीचं विरोचक आहे हे सत्य अद्वैतसमोर आल्यानंतर आता त्याच्या जीवाला आणखीच धोका … Read more

‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; लग्नानंतर सोडली मालिका

Rama- Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनल पवारचं नुकतंच मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी सोनलने तिचा अनेक वर्षांपासूनचा मित्र समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधली. सोनल आणि समीरचा लग्नसोहळा अत्यंत जंगी पद्धतीने पार पडला. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर सोनलने तिच्या लग्नाआधीचे विधी मेहंदी, हळद व संगीत सोहळ्याचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ … Read more

‘एकीकडे देशभक्तीचं प्रदर्शन.. दुसरीकडे स्वार्थाचा बाजार’; जावेद अख्तरांचे विधान चर्चेत

Javed Akhtar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही. ती चालत आहे आणि कायम चालत राहील. या देशाचा एक आत्मा आहे, ज्याला कोणीही मारू शकत नाही. आणि हाच जिवंत असलेला आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार व संवादलेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांनी नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय … Read more

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे निधन; कलर्स मराठीने वाहिली श्रद्धांजली

Umesh Namjoshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करीत प्रेक्षकांचे उत्तम कलाकृती देणारे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेश नामजोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेता … Read more

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा टिजर प्रदर्शित; ‘हा’ अभिनेता साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘शिवरायांचा छावा’ हा आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट चर्चेत आहे. श्री शिवराज अष्टकसोबतच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट कधी रिलीज होतोय याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांविषयी विशेष उत्सुकता पहायला मिळाली. अखेर या चित्रपटाचा टिझर समोर आल्यानंतर छत्रपती … Read more

‘मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई…’; पत्नीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची भावनिक पोस्ट

Bela_ Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘जत्रा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचा दर्जा काही औरच आहे. आज केदार शिंदे हे नाव यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असले तरीही इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत फार मोठी आहे. त्यांच्या पडत्या काळात … Read more