‘.. अन भीतीची बाराखडी आठवली’; ‘पंचक’चं मजेशीर टायटल सॉंग व्हायरल

Panchak Tiltle Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी … Read more

काय असेल ‘8 दोन 75’चं रहस्य..? चित्रपटाच्या टीजरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारी२०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून अलीकडेच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी “८ … Read more

‘दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस…’; अभिनेत्याने शेअर केला ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा भावस्पर्शी किस्सा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने केवळ अभिनयामूळे नव्हे तर त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे कायम चर्चेत येत असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टिशी संबंधित, राजकीय, सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. इतकंच नव्हे तर, अनेकदा ते स्वतःचे अनुभव आणि शूटिंग दरम्यानचे किस्सेसुद्धा शेअर करतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हि भूमिका ते … Read more

म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग … Read more

‘भद्रकाली’ची 59 वी क्रेझी कलाकृती येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

Mazya Baykocha Navra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत खास नाते आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार थेट कनेक्ट होत असतात. त्यामुळे चित्रपटांइतकाच नाटकांचा देखील मोठा प्रेक्षकवर्ग आहे. रंगभूमीवर सातत्याने होणारे नवनवीन प्रयोग हे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी ठरतात. आताही अशीच मनोरंजनाने परिपूर्ण खुमासदार शैलीतील नवी नाटिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ‘माझ्या बायकोचा नवरा’ … Read more

हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास..? संसदेतील खासदारांच्या निलंबनावर अभिनेत्रीचा सवाल

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. कधी मनोरंजन सृष्टीतील महत्वाच्या विषयांवर ती रोखठोक बोलते. तर कधी समाजातील गंभीर मुद्दे थेट मांडताना दिसते. इतकेच काय तर अनेकदा राजकीय विषयांवर देखील ती परखडपणे आपले मत मांडताना दिसते. आताही तेजस्विनीने अशाच एका विषयावर … Read more

वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!!! ‘शिवरायांचा छावा’ येतोय; फर्स्ट लूकने वाढवली उत्सुकता

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्टाचे आद्यदैवत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नुसतं छत्रपती म्हटलं कि डोळ्यासमोर शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास उभा राहतो. मराठी सिनेविश्वातील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारलेले चित्रपट तयार केले आहेत. या ऐतिहासिक चित्रपटांना कायम प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर … Read more

लगीनघटीका समीप आली!! मुग्धा- प्रथमेशच्या लग्नाआधीचे विधी सुरु; घाणा भरला.. हळद लागली..

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आमचं ठरलं म्हणत..’ प्रथमेश आणि मुग्धाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांच्या लग्नविधींचा श्रीगणेशा झाला आहे. व्याहीभोजन, हळद समारंभ आणि … Read more

मनसोक्त हसणारी ‘पारू’.. बिनधास्त जगणारे ‘शिवा’; झी मराठीवर सुरु होणार दोन नव्या मालिका

Paaru_Shiva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका बंद झाल्या. मालिका बंद होण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका केवळ कमी टीआरपी असल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आल्या. अवघ्या काही महिन्यातच या मालिका बंद झाल्यानंतर आता लवकरच ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा … Read more

‘माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी..’; लाडक्या लेकाच्या वाढदिवशी प्रसादची भावनिक पोस्ट

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी अभिनेता प्रसाद खांडेकर प्रसिद्धी झोतात आला. आपल्या अभिनय आणि विनोद शैलीच्या बळावर त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. अलीकडेच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून प्रसादचा लेक श्लोकने अभिनय विश्वात पदार्पण केले आहे. अशातच श्लोकच्या वाढदिवशी त्याच्या बाबाने … Read more

‘त्या’ खास व्यक्तीच्या आठवणीत भावुक झाला हार्दिक जोशी; म्हणाला, ‘मला नेहमी खंत राहील..’

Hardeek joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चालतंय की.. म्हणत अभिनेता हार्दिकने जोशीने साकारलेला राणा दा प्रत्येकाच्या मनात घर करून बसला.या भूमिकेमुळे अभिनेता हार्दीक जोशीला मोठा चाहता वर्ग मिळाला. त्याचे चाहते त्याला कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी आतुर असतात. सध्या तो झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या रिऍलिटी शोचे सुत्रसंचालन करताना दिसतोय. हार्दीकचा हा शो प्रचंड चर्चेत असून प्रेक्षकांचा … Read more

‘गेल्या 8 वर्षांपासून ..’; ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याने दिली लॉंगटाईम रिलेशनशिपची कबुली

Rajas Sule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आणि त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये टॉप १० मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे हि मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर यांच्यासह … Read more

‘रस्त्यावर एकही लहान मुलाला भीक मागताना…’; गौरव मोरेच्या ‘त्या’ वक्तव्यावर कौतुकाचा वर्षाव

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर अभिनेता गौरव मोरे प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. आपल्या कमाल कॉमिक अंदाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा तर गौऱ्याचा फेमस डायलॉग ज्याच्या प्रेक्षक प्रेमात आहेत. या कार्यक्रमातून त्याला ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ … Read more

‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा..!! मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला लागलं म्हाडाचं घर; शेअर केला Video

Ashvini Kasar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासारने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी शेअर केली आहे. नुकताच तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ज्याची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओत अश्विनी तिच्या कुटुंबीयांसोबत नव्या घरात पूजा करताना दिसते आहे. माहितीनुसार, अश्विनीला म्हाडाचं घर लागलं असून हे तीच पहिलं आणि … Read more

‘माझ्या अळनी भावांनो, थंड घ्या..’; किरण मानेंची ‘ती’ खरमरीत पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. टीव्ही मालिका त्यानंतर बिग बॉस मराठीसारखा रिऍलिटी शो आणि आता चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात किरण माने झळकले आहेत. त्यांचा ग्रामीण भागात विशेष चाहता वर्ग आहे आणि त्यांची स्वतःची नाळ गावच्या मातीशी जोडलेली असल्यामुळे ते कायम गावाकडच्या गोष्टी करताना दिसतात. आताही त्यांनी अशीच एक … Read more