‘याच हट्टाग्रहाने…’; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा अपमान.. मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Swapnil Rajshekhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच १९ नोव्हेंबर २०२३ रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ज्यामुळे देशभरातून नाराजी व्यक्त केली गेली. या सामन्याबद्दल क्रीडा, राजकीय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातून दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या. दरम्यान एका मराठी अभिनेत्याने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल … Read more

‘सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने…’; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला अंबाबाईच्या मंदिरातील अनुभव

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर उत्तम कवी आणि सूत्रसंचालक म्हणून देखील संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. शिवाय संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो … Read more

‘उशीर झाला असला तरी..’; समीरा गुजरने शेअर केल्या ‘त्या’ खास कार्यक्रमाच्या आठवणी

Samira Gujar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समीरा गुजरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसते. समीरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री समीरा गुजरने नुकतीच तिच्या अधिकृत सोशल … Read more

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र दिसणार; ‘या’ चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करणार

Sayali Sanjeev_Rishi Saxena

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर … Read more

मृण्मयी देशपांडेने शेअर केली ‘त्या’ खास पत्राची झलक; म्हणाली, ‘हे .. मी फ्रेम करून ठेवणार’

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मृण्मयी देशपांडे अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता लवकरच सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात मृण्मयी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एकीकडे या चित्रपटातबाबत प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मृण्मयी तिने साकारलेल्या भूमिका … Read more

‘सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा…’; नवऱ्याच्या वाढदिवशी नम्रता संभेरावची खास पोस्ट

Namrata Yogesh Sambherao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. भन्नाट कॉमेडी स्किटचे प्रोमो, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती यासह ती अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी याच माध्यमातून चाहत्यांसह शेअर करते. आज नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताचा पती … Read more

‘सभेनंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितेय..’; जरांगे पाटलांच्या सातारा सभेबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Jarange Patil_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यात विविध ठिकाणी जंगी सभा झाल्या. या सभेबाबत किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली… … Read more

‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील … Read more

बये चाललीस..? कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’चा प्रवास विसावणार; उद्या रंगणार शेवटचा प्रयोग

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. एकूण ६ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. उद्या बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेता झळकणार ‘या’ मालिकेत; साकारणार महत्त्वाची भूमिका

Amey Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरीही मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ही कलाकार मंडळी नवनवीन प्रोजेक्ट्समधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय … Read more

‘नात्यास नाव आपुल्या…’; लग्नाच्या गोड क्षणांसह अमृताने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात भेट झाली.. मग मैत्री झाली आणि अखेर लग्न बंधनात अडकले. आता हे नव्याने सांगण्याची गरज नाही कि आपण प्रसाद जवादे अन अमृता देशमुखबद्दल बोलत आहोत. नुकताच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

अलौकिक भेट!! ‘माझ्या घरी रामाची ही पहिली मूर्ती…’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Radhika Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे राधिका प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिणी देविकाचे पात्र साकारले होते. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राधिका ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकामूळे चर्चेत आली आहे. आताही तिने सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

लेकासोबत रंगली किरण मानेंची मैफिल; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘भान हरपून गायला लागलो…’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे अत्यंत लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक विषयावर ते आवर्जून मत व्यक्त करताना दिसतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील व्यक्त होताना दिसतात. नुकतीच त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या … Read more

अमृताच्या मंगळसूत्राने तर प्रसादच्या लॉकेटने वेधलं लक्ष; तुम्ही पाहिलंत काय..?

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून एकत्र आलेले प्रसाद आणि अमृता अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घाट सुरु झालेली हि लव्हस्टोरी शेवटी लग्नमंडपापर्यंत पोहोचलीच. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लुकपासून ते मंगळसूत्राच्या डिझाईनपर्यंत सगळंच चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान अमृताचं जसं … Read more

एका हाऊसवाईफच्या गोष्टीची मोठी मजल; गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘बटरफ्लाय’ चित्रपटाची निवड

Butterfly Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ रोजी रविंद्र … Read more