खिडकीवर Kingfisher येऊन बसल्यावर काय करावं बुवा..? गटारी अमावस्येनिमित्त अवधूतची मजेशीर पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आहे. म्हणजेच गटारी अमावस्या आहे. दिनांक १७ जुलै, सोमवार रोजी ‘आषाढ अमावस्या’ अर्थात ‘दीप अमावस्या’ आहे. या दिवसाला स्वतःचे असे एक विशेष महत्व आहे आणि या दीप अमावस्येला हिंदू धर्मानुसार दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक सांगायचे झाले तर, ‘गटारी अमावस्या’ असा मूळ शब्द नसून ‘गतहारी अमावास्या’ असा आहे. या दिवसानंतर सुरु होणारा श्रावण हा हिंदू धर्मीयांसाठी उपवासाचा अत्यंत पवित्र महिना असतो. त्यामुळे या महिन्यात मांसाहार वा मद्यप्राशन केले जात नाही. तर या अमावस्येनिमित्त मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. याशिवाय सध्या त्याचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम जोरदार चर्चेत आहे. अवधूत गुप्तेला मराठी सिनेविश्वात प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता म्हणून ओळखले जाते. शिवाय तो अत्यंत स्पष्ट आणि परखड बोलणाऱ्यांपैकी एक असल्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एका पक्षाचा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिल आहे.

अवधूत गुप्तेने शेअर केलेल्या फोटोत त्याच्या खिडकीवर एक पक्षी बसलेला आपण पाहू शकतो. या फोटोसोबत अवधूत गुप्तेने अत्यंत मजेशीर असे कॅप्शन शेअर करताना लिहले आहे कि, ‘आता.. ‘दर्श अमावस्ये‘ (गटारी) दिवशी सकाळ सकाळ खिडकीवर ‘’Kingfisher’’च येऊन बसल्यावर माणसानं काय करावं बुवा..?!! #आमचंश्रीकृष्णनगर’. अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी विविध कमेंट केल्या आहेत. यामध्ये गायक आदर्श शिंदे, अभिनेत्री स्पृहा जोशी, दीप्ती लेले, संगीतकार सलील कुलकर्णी, व्हॉइस आर्टिस्ट मेघना एरंडे यांचा समावेश आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी विविध मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘सायंकाळी स्नान करून kingfisher नामक तीर्थ प्राशन करावे’. आणखी एकाने लिहिले, ‘देवाकडून आदेश आलाय. अजिबात दुर्लक्ष करू नये’.