हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षात प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवत रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी या अभिनेत्री झळकल्या होत्या. या अभिनेत्रींपैकी काही जणी सध्या एकत्र परदेशात फिरायला गेल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रींनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि रोहिणी हट्टंगडी या चौघी सध्या थायलंडला फिरायला गेल्या आहेत. दरम्यान त्यांनी क्रूझमधून प्रवास एन्जॉय केला आहे. अभिनेत्री सुचित्रा बांदेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या ट्रीपचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या अभिनेत्री समुद्राजवळच्या एका रेस्टोरंटमध्ये बसलेल्या दिसत आहेत. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पाहा, आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत’. या व्हिडीओमध्ये चौघी अभिनेत्री क्रूजवर धमाल मस्ती करताना दिसत आहेत.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीच्या माध्यमातून या व्हिडीओ शेअर केल्या आहेत. व्हिडीओ पाहून या अभिनेत्री थायलंडची ही सफर फारच एन्जॉय करत आहेत असे दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळपास ५ महिने होऊन गेले असले तरीही चाहत्यांमध्ये मात्र अद्याप या चित्रपटाची आणि त्यातील गाण्यांची क्रेझ बघायला मिळत आहे.