‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे प्रचंड चर्चेत राहिली. अशातच आता सईने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्याची आनंदवार्ता समोर आली आहे. अभिनेत्री सई लोकूर आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यामध्ये तिने एक फोटो शेअर करत सोबत आपल्याला मुलगी झाल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री सई लोकुर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे याच माध्यमातून सईने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी देताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, ‘आम्हाला मुलगी झाली आहे. तिचा जन्म १७ डिसेंबर २०२३ रोजी झाला. ती खूप सुदृढ, सुंदर आहे. आम्हाला या काळात मिळालेला पाठिंबा आणि आशीर्वादासाठी तुमचे खूप खूप आभार!! आम्हाला हे सांगताना फार आनंद होतोय की, आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि बाळ दोघे सुखरुप आहेत. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद!!’

सई लोकूर ही मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील एक अभिनेत्री आहे. जिने विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय सई लोकुरने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. ज्यामधून ती प्रसिद्धी झोतात आली.

सई लोकुरने ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉयसोबत लग्न केलं आणि डिसेंबर २०२३ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.