हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन तुफान गाजला. या सिजनमध्ये सामील झालेले जवळपास सगळे स्पर्धक चांगलेच चर्चेत राहिले. या सिजनमध्ये अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुखदेखील सहभागी झाले होते. दरम्यान शोमध्ये असताना प्रसादने त्याच्या भावना अमृतासमोर व्यक्त केल्या होत्या आणि तेव्हापासून हि जोडी चर्चेत होती. बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर अमृताने प्रसादला होकार दिला पण हे नातं सिक्रेट ठेवण्यात आलं. यानंतर आता दोघांनी थेट साखरपुडा झाल्याची माहिती सोशल मीडियावर देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
बिग बॉस मराठी चारनंतर प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. पण दोघांनी कधीच आपल्या नात्याबद्दल चर्चा केली नाही. यांनतर आता त्यांनी आपल्या नात्याला अधिकृतपणे जाहीर करत चक्क साखरपुडा उरकल्याची माहिती दिली आहे. अमृता आणि प्रसाद यांनी शेअर केलेल्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आमचा साखरपुडा झाला आहे. आम्ही आता अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे नात्यात बांधले गेलो आहोत. आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत’.
या पोस्टसोबत त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीखदेखील सांगितली आहे. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर प्रसाद आणि अमृताने शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोत त्यांनी आपल्या बोटांमधील अंगठ्या फ्लोण्ट केल्या आहेत. बिगबॉसनंतर अनेकदा प्रसाद आणि अमृता एकत्र स्पॉट झाले. कधी डिनर डेट, कधी नुसतीच भटकंती तर कधी इव्हेंटमध्ये एकत्र जाताना ते दिसले. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत मोठी चर्चा रंगली होती. यानंतर अखेर त्यांनी आपल्या नात्याला एक अधिकृत नाव दिले आहे. ज्याचा चाहत्यांना प्रचंड आनंद आहे.