माझी हाऊसवाईफ होशील का? मराठी अभिनेत्रींला साडीमध्ये पाहून चाहत्यानं केलं प्रपोज?


हॅलो बॉलिवूड मराठी : साडी नेसणं आता ट्रेंड झाला आहे. मुलींना साडीत पाहायला मुलांना खूप आवडतं. अशात एखाद्या अभिनेत्रीने साडी मधील आपला फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्यावर त्यावर लाईक्सचा पाऊस पडतो. एका मराठी अभिनेत्रीने साडीमधला फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला होता. त्यावर एका चाहत्याने चक्क माझी हाऊसवाईफ होशील का अशी कमेंट केली आहे.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) कायम आपल्या सिम्पल लूकने चाहत्यांना वेड लावत असते. नुकताच भाग्यश्रीने साडी नेसलेला एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर अनेकांनी तिला तू साडीत छान दिसतेस अशा कमेंट केल्या. काहींनी अगं बाई गं!!! असं म्हणत आपल्याकडं तुझ्या लूकवर प्रतिक्रिया द्यायला शब्दच नसल्याचं म्हटलं.

यामध्ये एका युजरने भाग्यश्रीला तू साडीमध्ये एकदम परफेक्ट हाऊसवाईफ दिसतेस अशी प्रतिक्रिया दिली. भाग्यश्रीच्या या साडीतील फोटोंवर तिचे चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. अनेकदा खूप ग्लॅमरस लुकपेक्षा सिम्पल बट स्वीट लूक समोरच्याला भुरळ पडतो हेच भाग्यश्रीच्या या फोटोशूटमधून दिसत आहे.