‘आईने घडवलेली आपल्या बाप्पाची मूर्ती..’; भूषण प्रधानने साजरा केला इको फ्रेंडली गणेशोत्सव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीने गदगदून जाणारे वातावरण. दरवर्षी सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीसुद्धा गणेहशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. एखादा सण साजरा करायचा म्हणजे नुसताच उत्साह असून फायदा नाही.. तर सण साजरा करताना सामाजिक भान जपणेदेखील तितकेच महत्वाचे असते. मराठी अभिनेता भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा विराजमान होतो. यंदाही प्रधान यांच्या घरी दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला गेला.

अभिनेता भूषण प्रधान याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर घरच्या गणेशोत्सवाचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले आहेत. भूषणने घरच्या गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यांनी केलेली सजावट दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. यंदा प्रधान यांच्या बाप्पाची मूर्ती भूषणच्या आईने घडवलेली आहे. याबाबत भूषणने स्वतः माहिती दिली आहे. भूषणची आई स्वतः शाडूच्या मातीने प्रधानांच्या बाप्पा घडवतात. तर भूषण स्वतः बाप्पाच्या मूर्तीला रंगवण्याचे काम . तसेच बाप्पाची आरासदेखील पर्यावरण पूरक असते.

भूषण प्रधानच्या घरी दरवर्षी थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. तसाच यंदाही त्यांनी बाप्पाचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. भूषणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘आपले बाप्पाचे आगमन!! आईने घडलेली आपल्या बाप्पाची!! या वर्षाची सजावट थीम: शाश्वत वाढ!! फुले त्यांच्या संक्षिप्त सौंदर्याने मोहित करत असताना, क्षणभंगुर फुलांच्या पलीकडे टिकून राहणाऱ्या शाश्वत हिरवाईचे संगोपन करण्याचे माझे ध्येय आहे. शाश्वत वाढीच्या या प्रवासात फुले हे केवळ एक आनंददायक उपउत्पादन आहे’.