Accident News : बॉलिवूड अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; फरारी कार जाळून खाक, पहा घटनेचा Video


Accident News : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) हिच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये फरारी कार जाळून खाक झाली असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत (Shaharukh Khan) स्वदेश चित्रपटात (Swadesh Movie) नायिकेच्या भूमिकेत काम केलेली गायत्री जोशी हिच्या अपघाताच्या बातमीने चित्रपट क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्री गायत्री तिचा पती विकास ओबेरॉय यांच्यासोबत इटली येथे लॅम्बोर्गिनी कारने प्रवास करत होती. यावेळी एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या कारची लाल रंगाच्या फरारी गाडीला धडक झाली. यानंतर मिनी ट्रक पलटी झाला. याबेली फरारी गाडीने पेट घेतला. या अपघातात फरारी गाडीतील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला तर जोशी आणि त्यांचे पती थोडक्यात बचावले.

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ मागील एका गाडीच्या फ्रंट कॅमेऱ्यात शूट झाला असून यामध्ये अपघात कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे. गायत्री यांचे पती विकास ओबेरॉय यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली असून त्यांची व गायत्री यांची तब्बेत व्यवस्थित असल्याचे सांगितले आहे.

गायत्री जोशीने 2004 मध्ये ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखसोबत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. मात्र, ‘स्वदेश’ हा एकच चित्रपट केल्यानंतर तिने अभिनयापासून दुर झाली आणि ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.