‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचे कमालीचे टिझर रिलीज झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा सात बायका आणि त्यांच्या धम्माल टूरची गोष्ट पहायला मिळणार आहे. ‘फक्त यावेळी लेडीज गॅंगमधील २ मेम्बर नवीन आहेत. तर ही टूर घेऊन जाणारा तो म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर याहीवेळी सुंदर आणि अविस्मरणीय अशा प्रवासाचा भाग असणार आहे. दरम्यान त्याचा एक फोटो आणि त्यावरील कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा कायम सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. या माध्यमातून तो आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ‘झिम्मा २’च्या सेटवरचा आहे. फोटोत सिद्धार्थ एका पिवळ्या बसला टेकून उभा आहे. हीच बस आपल्याला ‘झिम्मा २’मध्ये पहायला मिळणार आहे. या फोटोपेक्षा जास्त सिद्धार्थच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतले आहे. यात त्याने लिहिलंय, ‘आता झिम्माच्या बायका परत एकदा फोटो बॉम्ब करणार, त्या आधी स्वतःचे बरे फोटो टाकून घेऊया. नाही का? बाकी teaser कसा वाटला?’

शिवाय हा फोटो क्षिती जोगने क्लिक केल्याचे सिद्धार्थने सांगितले आहे. यावर सायलीने रागात कमेंट करत म्हटलं आहे कि, ‘माझा नाही काढलास गं फोटो?’ यावर क्षितीने नुसताच ‘हेहे’ रिप्लाय दिला आहे. ज्यावर सायलीने पुन्हा रेड ईमोजी शेअर केला आहे. याआधी लोकप्रिय ठरलेली ‘झिम्मा’मध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सोनाली कुलकर्णी आणि सायली संजीव या ७ जणी होत्या. तर आता मृण्मयी आणि सोनाली सिक्वलमध्ये दिसणार नाहीयेत. तर ‘झिम्मा २’मध्ये रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघींची एंट्री झाली आहे. तूर्तास ‘झिम्मा २’चा टिझर तुफान व्हायरल होतोय आणि प्रेक्षक पसंती देत आहेत. आता प्रतीक्षा आहे ती चित्रपट रिलीजची. हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.