अश्विनी वाघमारे घेणार प्रेक्षकांचा निरोप; झी मराठीची ‘तू चाल पुढं’ मालिका ऑफ एअर होणार

Tu Chaal Pudh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका गेल्या काही महिन्यात लागोपाठ प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसलय. अजूनही मालिका बंद होण्याचा पाढा सुरूच आहे. गेल्या २०२३च्या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या दोन मालिका ऑफ एअर झाल्या. या मालिकांचा टीआरपी इतर मालिकांच्या तुलनेत कमी असल्यामुळे वाहिनीने हा निर्णय घेतला. यानंतर … Read more

‘खूप फिल्मी वाटू शकतं…’; ‘BIGG BOSS मराठी 4’ संबंधित अक्षय केळकरची स्पेशल पोस्ट

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता आणि अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या लुकसह वेगवगळ्या पोस्ट शेअर करत तो नेहमीचा चर्चेत येताना दिसतो. अभिनेता, निवेदक आणि चित्रकार अशी अक्षयची ओळख आहे. सोशल मीडियावर तो कायम आपली चित्र आणि कलाकृतीचे दर्शन घडवताना दिसतो. शिवाय बिग बॉससाठी तो कायम … Read more

Siddharth Jadhav | सिद्धूची स्टाईलचं न्यारी ! सोशल मीडियावर व्हायरल झाला नवा लूक

Siddharth Jadhav

Siddharth Jadhav | अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या अभिनयाने आणि विनोद आणि सगळ्यांनाच आजपर्यंत खळखळून हसवले आहे. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याच एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात झळकला आहे. सिद्धू हा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच … Read more

Suchitra Bandekar | रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ वेबसिरीजमध्ये मराठमोळ्या सुचित्रा बांदेकरची वर्णी, ट्रेलरने वेधले लक्ष

Suchitra Bandekar | मराठी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती नाटक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. परंतु आता सुचित्राच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार आहे. कारण लवकरच सुचित्रा एका हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरीज ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला आहे. आणि यामध्ये सुचित्राची … Read more

‘अग्गंबाई सूनबाई’ फेम उमा पेंढारकर ठरली यूट्यूबच्या सिल्व्हर बटणची मानकरी; म्हणाली, ‘स्वप्न पूर्ण होतात..’

Uma Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकारांचे आणि चाहत्यांचे नाते फार वेगळे असते. अत्यंत भावनिक दृष्ट्या ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामुळे कलाकार मंडळी काही ना काही कारणामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उमा पेंढारकर. ‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण त्यांनतर उमाने मनोरंजन … Read more

रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते!! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईच्या रिक्षातून कंबरतोड प्रवास; व्हिडीओ झाला व्हायरल

Mukta Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईचा वडापाव जितका प्रसिद्ध आहे तितकीच मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था कायम चर्चेत असते. मुंबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठाले खड्डे वाहनधारकांना फार त्रासदायक ठरतात. कुठे प्रवास करायचं म्हटलं कि आधीच कंबरेला आणि मानेला ‘सज्ज व्हा…’ असे सांगावे लागते. अशा रस्त्यांमुळे प्रवासाची मजा आधीच निघून जाते. ज्याचा सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच वैताग आला आहे. … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री ध्वनी प्रदूषणामूळे हैराण; म्हणाली, ‘का सहन करायचं..?’

Mugdha Godbole Ranade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसाठी लेखिका म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले- रानडे सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. आपल्या लेखणीसह आपल्या अभिनयातून त्यांनी कायम प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सध्या त्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या ममता हे पात्र साकारताना … Read more

9 व्या AIFF चा समारोप!! आशुतोष गोवारीकरांनी साधला उपस्थितांशी संवाद; म्हणाले, ‘हा माझ्यासाठी मास्टर क्लास..’

AIFF

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र, इथे विभागीय चित्रपटांसह जागतिक चित्रपट पाहायला मिळत आहेत. मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल, जिथे चित्रपट येतील आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहचतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या … Read more

बांदेकर कुटुंबीयांची आनंद यात्रा!! देवदर्शनासाठी केला ट्रेनचा प्रवास; साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

Suchitra_ Aadesh Bandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे अत्यंत लाडके जोडपे आहे. त्यांची लव्ह स्टोरी आणि त्यांचा कलाविश्वातील प्रवास सगळ्यांनाच माहित आहे. आदेश बांदेकर हे महाराष्ट्रासाठी भावोजी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमधून प्रचंड नावलौकिक मिळवले आहे. त्यांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव सोहम आहे. अलीकडेच … Read more

Bhagya Dile Tu Mala | ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत विदिशा म्हसकरची एंट्री, मालिकेला येणार नवे वळण

Bhagya Dile Tu Mala

Bhagya Dile Tu Mala | भाग्य दिले तू मला ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेला एक रंजक वळण आलेले आहे. घरात झालेल्या वादामुळे रत्नमाला मोहिते कावेरी आणि राजवर्धन यांना त्यांचे राहते घर सोडावे लागले आह. तर एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या बिजनेस देखील सोडावा लागलेला आहे. या मालिकेत एवढं सगळं चालू … Read more

Kiran Mane | आता जाळ अन् धूर संगटच! किरण मानेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Kiran Mane

Kiran Mane | बिग बॉस मराठी या शो मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सध्या कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून उदयास आले आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला विश्वामध्ये तर ते सुपरहिरो आहेतच.परंतु आता किरण मानेने राजकारणात एन्ट्री केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये … Read more

‘ठरलं तर मग’मधील अपघाताचा प्रसंग दाखवण्यासाठी टीमने घेतली प्रचंड मेहनत; BTS व्हिडिओ व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे कथानक, यातील पात्र, येणारे ट्विस्ट कायम प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी तर प्रेक्षकांची फारच लाडकी आहे. त्यामुळे हि मालिका टीआरपीच्या रेसमध्ये देखील कायम टॉप ५ मध्ये दिसते आहे. सध्या मालिकेत मधूभाऊंच्या केसचा सिक्वेन्स सुरू आहे आणि … Read more

रोहित शेट्टीच्या कॉप सिरीजमध्ये झळकणार मराठमोळे कलाकार; समोर आली पहिली झलक

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाविश्वात भाषेचा आणि मनोरंजनाचा मोठा संबंध आहे. ज्या प्रेक्षकांची जी भाषा त्यामध्ये त्यांचे मनोरंजन करणे हि मोठी जबाबदारी कलाकारांवर असते. हि जबाबदारी प्रत्येक भाषेतील कलाकार व्यवस्थित पार पाडत असतात. अशातच पंख विस्तारात हे कलाकार इतर भाषांमध्ये काम करून त्यांचा चाहता वर्ग वाढवताना दिसतात. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी हिंदी तसेच दाक्षिणात्य … Read more

‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचा नुकताच वाढदिवस झाला. प्रार्थनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मंडळींनी विविध पोस्ट शेअर करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टचा समावेश आहे. यामध्ये कुशलने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान … Read more

‘एकदा येऊन तर बघा’नंतर प्रसाद खांडेकरकडून नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार कलाकार एकत्र दिसणार

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर फार लोकप्रिय आहे. अलीकडेच त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांनतर आता प्रसाद खांडेकरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल … Read more