लग्नानंतर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची पहिली पोस्ट; म्हणाले, आमचं झालंय!!!

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वातील लाडकं जोडपं मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अलीकडेच एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मुग्धा आणि प्रथमेश यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केले. दोघांचा हा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला. यावेळी त्यांच्या लग्नाला मराठी कलासृष्टीतील अनेक गायक तसेच कलाकार मंडळी हजर होते. … Read more

कोणी? कधी? कुठे? आणि कसा रचला ‘सापळा..’; चिन्मय मांडलेकरच्या आगामी सिनेमाची घोषणा

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. शिवराज अष्टकच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर आणि … Read more

विशाल निकमचं नशीब फळफळलं; आगामी चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

Vishal Nikam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या अत्यंत लोकप्रिय ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या मराठी सीजनचे तिसरे पर्व तुफान गाजले. अभिनेता विशाल निकम हा या पर्वाचा विजेता ठरला आणि चांगलाच प्रसिद्धी झोतात आला. आपल्या वागणुकीने, संस्कारांनी आणि दमदार खेळाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर तो काही मालिकांमध्ये दिसला. पण आता लवकरच विशाल ऐतिहासिक चित्रपटामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारताना … Read more

‘राजगृहात येणं अशा पद्धतीनं साजरं झालं…’; किरण मानेंनी शेअर केला ‘तो’ खास किस्सा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतात. अनेकदा आपल्या कामाचे अपडेट आणि वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळे अनुभव ते विविध पोस्टच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. आताही त्यांनी वैयक्तिक आयुष्यात आलेला एक भन्नाट अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी राजगृहाबाहेर भेटलेल्या एका नवविवाहीत जोडप्याबद्दल … Read more

स्ट्रॉंग आहेस तर स्वतःच्या जीवावर खेळ, सुशांतचं नाव कशाला घेतेस..? रुपाली भोसलेने अंकिता लोखंडेला सुनावले

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ हा प्रेक्षकांचा अत्यंत फेव्हरेट म्हणावा असा रिऍलिटी शो आहे. मग तो मराठी सीजन असो हिंदी असो किंवा अन्य कोणत्या भाषेतील सीजन असो… ज्या त्या सिजनचा मोठा प्रेक्षक वर्ग हा असतोच. सध्या ‘बिग बॉस’ हिंदीचा १७ वा सीजन सुरु आहे. यामध्ये ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे आणि तिचा विकी जैन स्पर्धक … Read more

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला कुठेय..? मिलिंद गवळी म्हणाले, ‘गजबजलेल्या.. रहदारीच्या..’

Aai Kuthe Kay Karte Shooting Set

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचा लाडका आहे. सकारात्मक असो किंवा नकारात्मक यातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत ‘अनिरुद्ध’ हे पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. मालिकेविषयी वेगवेगळ्या अपडेट ते या माध्यमातून … Read more

प्रेक्षकांच्या लाडक्या अरुंधतीला मिळाला ‘हा’ महत्वाचा पुरस्कार; अभिनेत्रीने सोशल मीडियावर मानले आभार

Madhurani Gokhale Prabhulkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधती हि मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती कायम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते. अशातच मधुराणी प्रभुलकरला नुकतंच ठाणे महानगरपालिकेच्या ‘गंगा जमुना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची हि … Read more

नांदा सौख्य भरे!! थाटामाटात पार पडला मुग्धा- प्रथमेशचा पारंपरिक विवाहसोहळा; पहा फोटो

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी झोतात आलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अखेर २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आता मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटेची झाली. खऱ्या आयुष्यात त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडलं आणि आपल्या नात्याला अधिकृत नाव … Read more

मुग्धा- प्रथमेशचा ग्रहमख विधी संपन्न; सोशल मीडियावर फोटोंनी वेधलं लक्ष

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे दोघेही रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत. संगीत कलाविश्वात दोघांनीही विशेष प्राविण्य मिळवत स्वतःचे नाव तयार केले आहे. आज दोघेही उत्तम गायनाच्या बळावर अनेक रसिकांच्या कानांना मंत्रमुग्ध करतात. मराठी संगीत कला विश्वातील ही लोकप्रिय जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक … Read more

श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; पत्नीने मानले मदतकर्त्यांचे आभार, म्हणाली…

Deepti Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यांनतर मुंबईतील एका रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल केले गेले आणि त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. श्रेयसच्या प्रकृतीबाबत बातम्या पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आता श्रेयस तळपदेला डिस्चार्ज देण्यात आला असून तो सुखरूप त्याच्या … Read more

‘.. अन भीतीची बाराखडी आठवली’; ‘पंचक’चं मजेशीर टायटल सॉंग व्हायरल

Panchak Tiltle Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॅा. श्रीराम नेने आणि माधुरी दिक्षित नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंटावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. एकम… द्वितीय… तृतीय… अशी … Read more

काय असेल ‘8 दोन 75’चं रहस्य..? चित्रपटाच्या टीजरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट १९ जानेवारी२०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून अलीकडेच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी “८ … Read more

‘दोन वर्षांपूर्वीचा तो दिवस…’; अभिनेत्याने शेअर केला ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा भावस्पर्शी किस्सा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने केवळ अभिनयामूळे नव्हे तर त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे कायम चर्चेत येत असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टिशी संबंधित, राजकीय, सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. इतकंच नव्हे तर, अनेकदा ते स्वतःचे अनुभव आणि शूटिंग दरम्यानचे किस्सेसुद्धा शेअर करतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील हि भूमिका ते … Read more

म्हातारा येडा झालाय..!! ‘जमाल कुडू’ गाण्यावर नारकर जोडप्याचा डान्स; ट्रोलर्सने पुन्हा साधला निशाणा

Narkar Couple

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेता अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. कायम वेगवेगळ्या गाण्यावरील रिल्स शेअर करून हे जोडपं चर्चेत येत असतं. त्यांचे अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नारकर जोडप्याच्या रिल्समूळे अनेकदा ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. नुकतेच या जोडप्याने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ट्रेंडिंग … Read more

‘भद्रकाली’ची 59 वी क्रेझी कलाकृती येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार शुभारंभ

Mazya Baykocha Navra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक आणि रसिक प्रेक्षकांचे अत्यंत खास नाते आहे. या माध्यमातून प्रेक्षक आणि कलाकार थेट कनेक्ट होत असतात. त्यामुळे चित्रपटांइतकाच नाटकांचा देखील मोठा प्रेक्षकवर्ग आहे. रंगभूमीवर सातत्याने होणारे नवनवीन प्रयोग हे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी ठरतात. आताही अशीच मनोरंजनाने परिपूर्ण खुमासदार शैलीतील नवी नाटिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ‘माझ्या बायकोचा नवरा’ … Read more