‘आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं…’; छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा’ने गोव्यात सुरु केला ‘हा’ व्यवसाय

Akshaya Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनयासह अन्य क्षेत्रात पदार्पण करत प्रगतीचे पाऊल टाकले आहे. यामध्ये प्राजक्ता माळी, निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल, प्रार्थना बेहेरे, अभिज्ञा भावे अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये आता छोट्या पडद्यावरील सुंदरा म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. अक्षया मूळ गोव्याची असल्यामुळे तिने बहिणीसोबत … Read more

Pooja Sawant Engagement – We are engaged..!! पूजा सावंतने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत दिला चाहत्यांना सुखद धक्का

Pooja Sawant Engagement

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) कलरफुल.. अशी ओळख असलेली मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदीतही पूजाने पाय रोवले आहेत. त्यामुळे पूजाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि या माध्यमातून ती वैयत्तिक … Read more

आवलीची जखम कायमची का भरली..? सोनाली कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर दैवत्वाची प्रचिती देणारं ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक तुफान गाजलं. अलीकडेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला आणि या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात पार पडला. प्रेक्षकांच्या आणि रंगभूमीच्या साक्षीने या नाट्यकलाकृतीने निरोप घेतला. मात्र या नाटकाने गाजवलेली … Read more

Rinku Rajguru |रिंकू राजगुरूने सांगितला ‘झिम्मा 2’ चा अनुभव; म्हणाली, ‘102 डिग्री ताप असताना मी…’

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सध्या ‘झिम्मा 2’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हेमंत होमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करत आहे. 2021 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते आता देखील झिम्मा 2 ला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटात रिंकू राजगुरु हिचा … Read more

‘रंगमंचावरचा हा भारावून टाकणारा अनुभव…’; भरत जाधव यांच्या नव्या नाटकाचे प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून कौतुक

Sanjay Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित ‘अस्तित्व’ ही नाट्यकलाकृती सध्या रंगभूमीवर गाजताना दिसत आहे. या नाटकाचे कथानक अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व शोधणाऱ्या कुटुंबावर आधारलेलं आहे. हे एक कौटुंबिक नाटक असून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या नाटकात भारत जाधव, चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, श्याम घोरपडे, जयराज नायर हे मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान … Read more

हेमांगी कवी साकारतेय हिंदी मालिकेत मराठमोळी भूमिका; म्हणाली, ‘हे पात्र साकारताना..’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी केवळ तिच्या अभिनय शैलीमुळे नव्हे तर ती शेअर करत असलेल्या पोस्टमुळे देखील अनेकदा चर्चेत येताना दिसते. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमातून हेमांगी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदी भाषिक प्रोजेक्ट्समध्ये देखील हेमांगी काम करते … Read more

‘मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी…’; ‘झिम्मा 2’बाबत मराठी अभिनेत्याने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Abhijeet Khandkekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा’च्या अभूतपूर्व यशानंतर आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा सिक्वल धुमाकूळ घालतो आहे. शुक्रवारी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षक देखील या चित्रपटाची वाहवाह करत आहेत. अशातच मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकरकडे हा चित्रपट पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया फारच … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त ठाण्यात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच … Read more

Hemant Dhome | ‘भारतातील सिस्टीम वाईट…’ हेमंत ढोमेने सांगितले परदेशात शूटिंग करण्यामागील कारण

Hemant Dhome

Hemant Dhome | सध्या मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत आहे. आणि या चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी असल्यासारखे दिसते. चित्रपटाचे स्टारकास्ट तसेच लोकेशन या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. मागील अनेक दिवसापासून काही मराठी चित्रपटांचा शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचे एवढे चांगले दिवस कसे आले भारत सोडून ते लंडनमध्ये शूट कसे … Read more

Sukanya Mone | ‘अचानकपणे कथेला वेगळं वळण दिलं जातं…’, सुकन्या मोने यांनी सांगितला मालिका विश्वातील अनुभव

Sukanya Mone

Sukanya Mone |आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे. ज्यांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे.आणि ते अनेक वेळा अनेक प्रसंगावर त्यांचे मत व्यक्त करत असतात. आणि यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने कुलकर्णी. त्यांनी आपल्या अभिनयाने गेले कित्येक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम … Read more

परकेपणा संपणार..? सायली- अर्जुनच्या डीनर डेटनंतर दोघांचं नातं बहरणार..? नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील दिवाळी सीक्वेन्स दरम्यान एक मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बायको सायलीला अतिशय खास गिफ्ट दिले. अर्जुनने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मधूभाऊ आणि आश्रमातील मुलांना घरी आणून सायलीला चकित केले. अर्जुनचे हे सरप्राईज पाहून सायली अतिशय आनंदी आणि तितकीच भावुक झाली. यानंतर, आपल्याला … Read more

‘बनवायची होती लव्हस्टोरी पण गडबड झाली थोडी…’; ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पहाचं

Ek Don Teen Char

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना नुकताच आगामी चित्रपट ‘एक दोन तीन चार’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २’नंतर आता ‘एक … Read more

‘अबोला धरलेली सखी सापडलीच तर…’; जितेंद्र जोशीचा ‘संगीत देवबाभळी’ला काव्यमय निरोप

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर दैवत्वाची प्रचिती देणारं अन भक्ताशी देवाचं असलेलं नातं व्यक्त करणारं नाटक ‘संगीत देवबाभळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नाटकाशी प्रेक्षकांची नाळ इतकी घट्ट जोडली गेली होती कि त्याला निरोप देणं फार जड झालं. नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात कार्तिकी एकादशीच्या पुर्वसंध्येला पार पडला. प्रेक्षकांच्या आणि रंगभूमीच्या साक्षीने एका उत्तम … Read more

‘झिम्मा 2’ सुपरहिट होणार…? प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत पहिल्याच दिवशी रग्गड कमाई

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट अखेर काल प्रदर्शित झाला. गेल्या महिन्याभरापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळाली. कोविडनंतर ‘झिम्मा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. यानंतर आता ‘झिम्मा २’ची सुरुवात हाऊसफुल्ल शोसोबत झाली आहे. इतकंच काय तर प्रेक्षकांना तुफान प्रतिसादासह या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स … Read more

प्रियदर्शनीच्या ‘लग्नाला 60 दिवस बाकी’…? MHJ फेम अभिनेत्रीच्या पोस्टमूळे चर्चांना उधाण

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले. यामध्ये अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरचा देखील समावेश आहे. पुण्याची विनम्र अभिनेत्री अशी प्रियदर्शनीची ओळख. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विविध प्रहसनांच्या माध्यमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांना हसवते. शिवाय तिने अभिनेता सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ या चित्रपट मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे आता … Read more