पुष्कर जोग घडवणार ‘मैत्रीची सुंदर सफर..’; आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’च्या भव्य कटआऊटचे अनावरण

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यामुळे घोषणेपासूनच ‘मुसाफिरा’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार..? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. तर आता प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर … Read more

हार्दिक जोशी खेळणार डेरिंगचा गेम; अॅक्शनपॅक्ड ‘क्लब 52’चा धमाकेदार टीजर रिलीज

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी कायम या ना त्या करणामुळे चर्चेत असतो. सध्या हार्दिक त्याच्या आगामी रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आणि आगामी चित्रपट ‘क्लब ५२’मूळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’चा टिझर मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना … Read more

‘जाणाऱ्याला थांब म्हणू नये…’; निरोप घेण्याआधी ‘संगीत देवबाभळी’च्या दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली ५ वर्ष ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि आता २०२३ मध्ये हे नाटक निरोप घेत आहे. आज कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईत षण्मुखानंद हॉल, सायन येथे रंगणार आहे. ‘देवबाभळी’ या लोकप्रिय नाटकाने निरोप घेऊ नये … Read more

Jhimma 2 | ‘तुम्ही खरंच दारू पिली होती का?’ झिम्मा 2 मधील ‘त्या’ सीनवर निर्मिती सावंत यांनी सोडले मौन

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा 2’ चित्रपट देखील येत्या काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री या चित्रपटात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन चालू … Read more

शूरा मीं वंदिलें..!! सुबोध भावेने शेअर केली ‘मानापमान’ चित्रपटाची झलक; अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष

Manapman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, सिरीज आणि चित्रपटातून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. संगीत नाटकावर आधारलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुबोध भावे आता एक नवा प्रयोग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच सुबोधने त्याचा आगामी चित्रपट ‘मानापमान’बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

‘याच हट्टाग्रहाने…’; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचा अपमान.. मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Swapnil Rajshekhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच १९ नोव्हेंबर २०२३ रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ज्यामुळे देशभरातून नाराजी व्यक्त केली गेली. या सामन्याबद्दल क्रीडा, राजकीय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातून दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्या. दरम्यान एका मराठी अभिनेत्याने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल … Read more

‘सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने…’; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला अंबाबाईच्या मंदिरातील अनुभव

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर उत्तम कवी आणि सूत्रसंचालक म्हणून देखील संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. शिवाय संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो … Read more

‘उशीर झाला असला तरी..’; समीरा गुजरने शेअर केल्या ‘त्या’ खास कार्यक्रमाच्या आठवणी

Samira Gujar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समीरा गुजरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसते. समीरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री समीरा गुजरने नुकतीच तिच्या अधिकृत सोशल … Read more

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र दिसणार; ‘या’ चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करणार

Sayali Sanjeev_Rishi Saxena

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर … Read more

मृण्मयी देशपांडेने शेअर केली ‘त्या’ खास पत्राची झलक; म्हणाली, ‘हे .. मी फ्रेम करून ठेवणार’

Mrunmayee Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मृण्मयी देशपांडे अत्यंत सुंदर आणि लक्षवेधी अभिनेत्री आहे. आजपर्यंत तिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. यानंतर आता लवकरच सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात मृण्मयी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. एकीकडे या चित्रपटातबाबत प्रेक्षकवर्ग उत्सुक आहेत. तर दुसरीकडे मृण्मयी तिने साकारलेल्या भूमिका … Read more

‘सोबती ह्या शब्दाला पुरेपूर न्याय देणारा…’; नवऱ्याच्या वाढदिवशी नम्रता संभेरावची खास पोस्ट

Namrata Yogesh Sambherao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली लॉली म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फार सक्रिय असते. भन्नाट कॉमेडी स्किटचे प्रोमो, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती यासह ती अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी याच माध्यमातून चाहत्यांसह शेअर करते. आज नम्रताने तिच्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताचा पती … Read more

‘सभेनंतरच्या पार्ट्या, दारू सगळं माहितेय..’; जरांगे पाटलांच्या सातारा सभेबाबत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Jarange Patil_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यात विविध ठिकाणी जंगी सभा झाल्या. या सभेबाबत किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ‘जरांगे पाटलांची राजधानी सातार्‍यातली सभा राजासारखी झाली… … Read more

‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील … Read more

बये चाललीस..? कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘संगीत देवबाभळी’चा प्रवास विसावणार; उद्या रंगणार शेवटचा प्रयोग

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी शुभारंभ झाला. एकूण ६ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. उद्या बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेता झळकणार ‘या’ मालिकेत; साकारणार महत्त्वाची भूमिका

Amey Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपली असली तरीही मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता ही कलाकार मंडळी नवनवीन प्रोजेक्ट्समधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहेत. या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वे आता स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय … Read more