‘होईन सावली उन्हात घर जरी…’; स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे शीर्षकगीत व्हायरल

Lakshmichya Pavlani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक संपले म्हणून त्या मालिका ऑफ एअर गेल्या. तर काही मालिकांचा टीआरपी खाली घसरल्याने त्या मालिका बंद करण्यात आल्या. अशातच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरु होताना दिसत आहेत. अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका सुरु झाली असून तिला प्रेक्षकांची चांगली पसंती … Read more

औक्षण, फुलांची आरास अन चमचमीत जेवण..; जवादे भावंडांनी केलं प्रसाद- अमृताचं केळवण

Prasad_ Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा मिळवली. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेले प्रसाद- अमृता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान त्यांचा साखरपुडा पार पडला असून अवघ्या काहीच … Read more

माझी लक्ष्मी!! सिद्धार्थ- मितालीने खरेदी केली पहिली आलिशान गाडी; पहा व्हिडीओ

Siddharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. दोघांचा स्वतःचा वेगवेगळा आणि एकत्र असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर हि जोडी कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. पण सध्या हि जोडी रोमँटिक फोटोंमुळे नव्हे … Read more

‘मी जशी काय आहे ते तिच्यामुळे…’; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ स्त्रीसाठी खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील हि सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस मराठी व्यक्तिरिक्त तिने ‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. नुकतीच … Read more

सोनाली- कुणालने दुबईत खरेदी केलं आलिशान घर; नेमप्लेटने वेधलं लक्ष

Sonalee_Kunal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अप्सरा अशी जिची ओळख आहे ती अभिनेत्री म्हणजे ‘सोनाली कुलकर्णी’. ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ आणि अशा अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये तिने अव्वल काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या आणि नृत्य शैलीच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेकांची क्रश असणारी सोनाली मिसेस बेनोडेकर झाली आणि अनेक तरुणांची हृदय … Read more

शिवानीने ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, ‘आपली पहिली भेट झाली तेव्हाच…’

Tula shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका सध्या तुफान चर्चेत आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हि अक्षरा आणि अधिपती यांची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तर मालिकेतील भुवनेश्वरी अर्थात अभिनेता कविता मेढेकर यांनी … Read more

‘अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली…’; मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सलाचं केलं ट्रोल

Surabhi Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी मंडळी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशीच एक खास पोस्ट मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री सुरभी भावेने शेअर केली आहे. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले असता तिने शाब्दिक फटाक्यांनी ट्रोलर्सची दिवाळी केली आहे. सुरभीने दिवाळीनिमित्त पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने … Read more

गौरी- जयदीपच्या पुनर्जन्म कथेत झळकणार नवी पात्रे.. तर ‘हि’ जुनी पात्र घेणार प्रेक्षकांचा निरोप

Sukh Mhnaje nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. या मालिकेत गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे. प्रत्येकाने साकारलेली पात्र हि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी नेहमीच अव्वल स्थानावर … Read more

शिंदे घराण्याचं कलाविश्वातून उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरु केला स्वतःचा पेट्रोल पंप

Shinde Family

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुसतं शिंदेशाही म्हटलं तरी लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्यातील गायकांचे चेहरे समोर दिसतात. जगभरात शिंदेशाहीचे चाहते आहेत. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा सुरेल वारसा आजही शिंदे घराण्यात कायम राखला जात आहे. आता शिंदे घराणं केवळ कलाविश्वापुरता मर्यादित राहिलेलं नाही. तर दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे घराण्याने आता उद्योग जगतात पदार्पण केलं आहे. यासंदर्भात गायक, अभिनेता … Read more

‘TRP नाही म्हणून मालिका बंद करायची ताकद वाहिन्यांकडे…’; मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली मनातील सल

Virendra Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात ‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच मालिका केवळ टीआरपी नसल्यामुळे बंद करण्यात आल्या. यांमध्ये ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेचा समावेश आहे. हि मालिका २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र पुरेसा प्रेक्षक न मिळाल्यामुळे मालिकेला टीआरपी काही लाभला नाही. दरम्यान फक्त आणि फक्त ६ महिन्यांतच ही मालिका बंद … Read more

सातारच्या बच्चनसोबत सावत्या धमाल करणार; एकाच चित्रपटात ‘माने बंधू’ झळकणार

Kiran Mane_Rohit Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते किरण माने लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटात त्यांच्यासोबत ‘महाराष्ट्रातील हास्यजत्रा’ फेम रोहित मानेदेखील महत्वाच्या भूमिके दिसणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं असं कि, किरण माने आणि रोहित माने दोघांची आडनावं सारखीच आणि गावही सातारा. त्यामुळे हे २ सातारकर एकाच चित्रपटात दिसणार आहेत याचा … Read more

हर हर महादेव!! दिवाळीत आकाश ठोसरने केली केदारनाथ यात्रा; पहा फोटो

Akash Thosar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या तुफान गाजलेल्या ‘सैराट’मधला परशा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. पण सध्या आकाश हा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण … Read more

‘तीच मज्जा आहे दुसऱ्या डावात..’; ‘झिम्मा 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा सण. हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, चलचित्र मंडळी घेऊन आले आहेत ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर. दिवाळीचे औचित्य साधत ‘झिम्मा २’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या वेळी निर्माते आनंद एल राय यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याला दिग्दर्शक … Read more

‘अजाग्रत – अंधारामागील सावल्या’; श्रेयस तळपदेने केली रहस्यमय चित्रपटाची घोषणा

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला हिंदी आवाज दिल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अजाग्रत’ या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाचे … Read more

‘… आणि भार्गवची नाळ जोडली गेली’; ‘नाळ 2’मधील मणीचं ‘असं’ झालं सिलेक्शन

Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाची. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच यातील कलाकारांचेही प्रेक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. ‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग २’ साठी … Read more