जोशींच्या घरी अक्षयाचा पहिला गणेशोत्सव; हार्दिकने शेअर केली बायकोसाठी खास पोस्ट

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीची सर्वाधिक गाजलेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधून प्रकाशझोतात आलेले अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे खऱ्या आयुष्यातही एकमेकांमध्ये गुंतले. दोघांनी लग्न केलं आणि आता ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरला हार्दिक- अक्षयाचा विवाहसोहळा पुण्यात पार पडला. त्यानंतर हे जोडपं सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहीलं … Read more

स्वानंदीचा ‘मोदक’ झाला ‘मोमो’; अभिनेत्रीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Swanandi Tikekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. जो तो बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळी देखील त्यांच्या घरगुती बाप्पाच्या सेवेत रुजू झाले आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सारेच जाणतो कि बाप्पाचा मोदक किती प्रिय आहेत. त्यामुळे घराघरात विविध प्रकारचे मोदक बनविले जात … Read more

पिंकीने साधला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

Sharayu Sonawane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’ ही सध्या टीआरपीमध्ये इतर मालिकांना चांगलीच स्पर्धा देते आहे. या मालिकेत पिंकीची मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे लोकप्रिय झाली आहे. दरम्यान शरयूचा चाहता वर्ग चांगलाच वाढत चालला आहे. दरम्यान एकीकडे राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत अभिनेत्री शरयू सोनावणेने … Read more

‘बॉईज 4’मध्ये नवे चेहरे दिसणार..; नव्या दोस्तांसोबत ढुंग्या, धैऱ्या अन कबीर थिएटरमध्ये राडा करणार

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सहकलाकारांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत असतानाच अखेर सर्वांचे असे एक पोस्टर नुकतेच झळकले आहे. त्यामुळे आता ‘बॅाईज ४’मध्ये या मोठ्या गॅंगची … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’मधील भन्नाट गाणे प्रदर्शित

Teen adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा … Read more

प्राजक्ता माळीला मिळाला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ बाप्पाच्या महाआरतीचा मान

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आज गणेश चतुर्थीच्या शुभमूहुर्तावर जल्लोषात आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची सायंकाळची … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’ म्हणजे काय..? सामान्य पोराचं अतिसामान्य आत्मचरित्र… पहायला प्रेक्षक आतुर

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता तुफान वाढली आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी … Read more

‘मी दुसरीत असताना ..’; गणेश चतुर्थीनिमित्त हेमांगीने शेअर केली बालपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा केवळ सण नसून हि एक भावना आहे. गणेशोत्सवात आनंदाची, हर्षाची, उत्साहाची एक लहर उठते. ज्यामध्ये सगळे भाविक न्हाहून जातात. सर्वसामान्यांसोबतच हा सण सेलिब्रिटी मंडळीही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. काहींनी बाप्पाची मुर्ती घरीच बनवली तर काहींनी खास आठवणी शेअर केल्या आहेत. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीनेदेखील तिच्या … Read more

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या आगमनासाठी ‘कलावंत’ पथकाची हजेरी; मिरवणुक पाहण्यासाठी पुणेकरांनी केली गर्दी

Kalavant Dhol Tasha Pathak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल- ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत- गाजत आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या मिरवणुकीची शान वाढविण्यासाठी ‘कलावंत’ ढोलताशा पथकाने … Read more

‘हे माझ्यासाठी चॅनल नाही..’; अद्वैत दादरकरचा ‘झी मराठी’च्या महत्वपूर्ण पदाला रामराम

Adwait Dadarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अद्वैत दादरकर हा अनेक कलाकृतींमुळे लोकप्रिय ठरला आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ तसेच ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेत तो अलीकडेच दिसला होता. अद्वैतने २०२२ साली ‘झी मराठी’ वाहिनीसाठी फिक्शन हेडची जबाबदारी स्वीकारली होती. साधारण दीड वर्ष त्याने ‘झी मराठी’ वाहिनीसोबत काम केल्यानंतर अधिकृतरित्या फिक्शन हेडच्या जबाबदारीतून … Read more

सोनालीच्या घरी विराजमान झाले तुकोबाप्पा; अभिनेत्रीने शेअर केले इकोफ्रेंडली गणेशाचे फोटो

Sonalee Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव म्हटलं कि सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आपोआपचं निर्माण होते. आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे अगदी जल्लोषात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’चा नाद सर्वत्र घुमला. अनेक सिने कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरीदेखील बाप्पाचे … Read more

‘लहान मुलांची आणि गणूची मैत्री काही औरच..’; क्रांती रेडकरने शेअर केला लेकींचा गोड व्हिडीओ

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हे नाव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रांती तिच्या अभिनयाइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. क्रांतीने २०१७ साली सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्न केलं. त्यांना २ मुली आहेत. हे जोडपं कायम वेगवेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान क्रांती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे ती … Read more

आले आले हो…. ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानूशालीच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन

Amit Bhanushali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर वर्षभर वाट पाहिल्यानंतर आज बाप्पा पुन्हा एकदा आपल्या भाविकांच्या भेटीसाठी आले आहेत. आजपासून पुढचे दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळणार आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. केवळ सर्वसामान्य नव्हे तर अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘ठरलं तर मग’ या … Read more

परदेशात मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी बाप्पाचं आगमन; स्वतःच्या हाताने केलं डेकोरेशन

uma hrishikesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींच्या घरीदेखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र वातावरण भक्तिमय, आनंदी आणि उत्साही झाले आहे. जो तो लाडक्या बाप्पाच्या सेवेत रुजू झाला आहे. केवळ देशभरात नव्हे तर विदेशातही बाप्पाचे आगमन करत मराठमोळ्या अभिनेत्रीने परंपरेला खंड पडू दिलेला नाही. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री … Read more

दमदार ‘सुभेदार’.. चंद्रकांत पाटलांनी थिएटरमध्ये अनुभवला कोंढाण्यावरील थरार; दिग्दर्शकाचे केले कौतूक

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘श्री शिवराज अष्टक’ हि प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची संकल्पना आहे. याच्या माध्यमातून आजच्या पिढीला श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दिग्पाल लांजेकर तरुणाचा आदर्श होऊ लागले आहेत. या अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ हा चित्रपट गेले तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. … Read more