Adesh Bandekar | ‘माझ्या मनाची साईज…’ वाढदिवशी आदेश बांदेकरांच्या मुलाने दिल्या भावनिक शब्दात शुभेच्छा

Adesh Bandekar

Adesh Bandekar | आदेश बांदेकर यांची ओळखी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अशीच आहे. अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टी मध्ये त्यांनी त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून ते घरोघरी पोहोचले l. अशातच आदेश बांदेकर यांनी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा सोहम बांदेकर यांनी वडिलांसाठी अत्यंत भावनिक पोस्ट केली … Read more

तब्बल 16 वर्षांनी सई आणि श्रेयश एकत्र, ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज

sai tamhankar and shreyash talpade

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि प्रेक्षकांना हाच चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे . तसेच केमिस्ट्री देखील सगळ्यांना आवडली आहे. या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. आणि या गाण्यात चक्क प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे ते म्हणजे … Read more

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाला मिळाले ‘एवढे’ पुरस्कार, अभिनेत्याने मानले आभार

ved movie

2023 मध्ये अनेक मराठी चित्रपट आले. आणि सगळे चित्रपट गाजले देखील त्यातीलच रितेश देशमुख यांचा दिग्दर्शित वेड हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील गाणी, संगीत त्याचप्रमाणे कथा प्रेक्षकांना खूप आवडली. आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादा वहिनींना सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतले. नुकतेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा पार पडला. आणि या सोहळ्यामध्ये रितेश देशमुख आणि जीनिलीया … Read more

‘मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त बघण्यासाठी…’; पृथ्वीक प्रतापची पोस्ट व्हायरल

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक विनोदवीर दिले. ज्यामध्ये अभिनेता पृथ्वीक प्रतापचा समावेश आहे. विविध स्किटमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून पृथ्वीकने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दरम्यान पृथ्वीक सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतो. आजही त्याने शेअर केलेली एक … Read more

जस्ट लुकिंग लाईक Wow!! मॉरिशसच्या बीचवर अमृता खानविलकरचं मोहक फोटोशूट; चाहते पडले प्रेमात

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाची चंद्रमुखी अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय दिसते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. तिचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधताना दिसतात. अशातच अमृताने तीच नवं फोटोशूट शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा प्रेमात पाडलं आहे. अमृता मॉरिशस सुट्ट्या एन्जॉय करतेय आणि इथले काही … Read more

‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याची ‘धर्मवीर 2’मध्ये वर्णी; साकारणार महत्वाची भूमिका

Ruturaj Phadke

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली ‘मन उडू उडू झालं’ मालिका संपली असली तरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका होती. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. सध्या या मालिकेतील बरीच कलाकार मंडळी नव्या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस … Read more

‘मधुरव बोरु ते ब्लॉग’च्या शिरपेचात मानाचा तुरा; जगविख्यात ‘काला घोडा फेस्टिवल’च्या शुभारंभी होणार खास प्रयोग

Madhurav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार’ असं म्हणणाऱ्यांपासून ते ‘मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते’ असं सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा मराठी भाषेचा अभिजात दर्जा कायम राखणारा ‘मधुरव बोरू ते ब्लॉग’ या कार्यक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला आहे. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘, ‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक … Read more

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री … Read more

‘डिलिव्हरी बॉय’ घेऊन येतोय धमाल एंटरटेनमेंट आणि जॉय; चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या टिझर आणि गाण्याने सोशल मीडियावर धमाल केल्यानंतर आता चित्रपटाचे एक नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर फारच गमतीशीर आणि लक्षवेधी ठरले आहे. मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर … Read more

प्रार्थना बेहरेने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; रोमँटिक व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले. आज कलाविश्वात तिने स्वतःचे पाय घट्ट रोवले आहेत. प्रार्थानाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. प्रार्थानादेखील या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्रार्थनाने सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच … Read more

‘एवढ्या लवकर संपायला नको होती..’; ‘या’ मालिकेला निरोप देताना प्रेक्षक झाले भावुक

Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यात अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यामध्ये काही अशा मालिका होत्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तर काही मालिकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि पसंती न मिळाल्याने त्या बंद कराव्या लागल्या. शिवाय काही मालिकांचे कथानक चांगले होते पण टीआरपी कमी असल्यामुळे वाहिन्यांनी त्या मालिका बंद केल्या. अशातच काही दिवसांपूर्वी आणखी एक … Read more

नवरा असावा असा!! लग्नानंतर प्रसादने थाटात साजरा केला अमृताचा पहिला सण; खास लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prasad- Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तयार झालेली जोडी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो, व्हिडीओ जुने होण्याआधीच प्रसाद- अमृताच्या लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांत आली आणि दोघांनी मिळून अत्यंत हटके पद्धतीने ती साजरी केली. या … Read more

मार्च महिन्यात होणार कल्लोळ.. नव्हे ‘लग्न कल्लोळ’; सिद्धूच्या नव्या सिनेमाचं पोस्टर आऊट

Lagn Kallol

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेविश्वात कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक आगळा वेगळा प्रयोग आणि भन्नाट कथानक असलेला नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो आहे. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लग्न कल्लोळ’ असे आहे. मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले असून या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर नुकतेच सोशल … Read more

‘वंगाळss वंगाळss वंगाळss’; ‘विश्वमित्र’ म्युझिक अल्बमच्या टायटल सॉंगचा ट्रेलर रिलीज

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काही दिवसांपूर्वीच मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विश्वमित्र’ या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा केली होती. यानंतर आता या अल्बममधील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. `विश्वमित्र’ या अल्बमचे टायटल ट्रॅक गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यातून नितेश चव्हाण आणि सुवर्णा … Read more

सेवा परमो धर्मः !! ‘NDA’च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘PB ग्रुप’च्या वतीने शॉर्टफिल्मची निर्मिती; पहा व्हिडीओ

PB Group NDA Shortfilm

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ने (NDA) नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘NDA’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. देश रक्षणासाठी तिन्ही … Read more