डिजिटल विश्वात आणखी एका OTT प्लॅटफॉर्मची एंट्री; ‘प्लॅनेट भारत’वर पाहता येणार हायपर लोकल कॉन्टेन्ट

OTT Platform

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून ‘प्लॅनेट भारत’ या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या ‘प्लॅनेट भारत’ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. … Read more

‘सुभेदार’ची रिलीज डेट पुन्हा बदलली; कधी होणार प्रदर्शित..? जाणून घ्या

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील ‘सुभेदार’ हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत. ‘सुभेदार’ येत्या १८ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार होता. पण रिलीज तोंडावर असताना त्याची रिलीज डेट पुन्हा बदलण्यात आली … Read more

दिवाळीत फुटणार विनोदाची माळ; पार्थ भालेरावच्या ‘पिल्लू बॅचलर’चे पहिले पोस्टर रिलीज

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विनोदी भूमिकांपासून गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेरावचा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. निर्माते सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर श्री गणेश मार्केटिंग अँड … Read more

एक पुरुष आणि सात बायकांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ‘इंद्रधनुष्य’; लंडनमध्ये शूटिंग सुरु

Indradhanushya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीला … Read more

‘किलर स्माईल.. जबरा स्टाईल..’; वैभव तत्त्ववादीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Tatwawadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वैभव तत्ववादी हा मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे. वैभवला जबरदस्त लूक, देखणा चेहरा आणि कमालीची स्माईल दैवी देणगी म्हणून मिळाली आहे. त्यामुळे लाखो तरुणींच्या दिलाची तो धडकन आहे. शिवाय वैभव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ज्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तो आवर्जून शेअर करताना दिसतो. त्याच्या प्रत्येक फोटोवर तरुण चाहतींच्या … Read more

‘नवरा झालो तरी मी किरकोळच राहणार’; ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशु बोहल्यावर चढणार..?

Pushkraj Chirputkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर अत्यंत गाजलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ संपून बरीच वर्ष झाली. पण अजूनही या मालिकेतील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांवर प्रेक्षक तितकंच प्रेम करत आहेत. अलीकडेच या मालिकेत मीनल हे पात्र साकारलेल्या अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा साखरपुडा दणक्यात पार पडला. यानंतर मालिकेतील आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याच्या लग्नाबाबत विविध चर्चा सुरु झाली आहे. … Read more

‘अनेक शपथा, अनेक वचनं, गेली अनेक वर्ष ऐकतोय, पण..’; महामार्गाची दुरावस्था पाहून हेमंत ढोमे भडकला

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध पोस्टच्या माध्यमातून तो कधी व्यक्त होतो तर कधी विविध मुद्द्यांना हात घालत परखडपणे टीका करतो. अनेकदा सोशल मीडियावर तो सामाजिक तसेच राजकीय विषयांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिसतो. आताही त्याने अशाच एका मुद्द्याला तोंड फोडले आहे. नुकतेच त्याने मुंबई- … Read more

तुम्ही अण्णाजींचा रोल करताय..? सिंधुताईंच्या लेकीचा ‘तो’ मॅसेज पाहून भारावला अभिनेता

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून कलर्स मराठी वाहिनीवर अनाथांना मायेच्या पदराची उब देणाऱ्या समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मालिका सुरु होते आहे. या मालिकेचे नाव ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ असे आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे सिधुताईंचे बाबा अभिमान साठे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांना या … Read more

दोघात तिसरा…!! ’36 गुणी जोडी’ मालिकेत रोहित राऊतची दमदार एंट्री; कथानकाला देणार ट्विस्ट

36 Guni Jodi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ हि मालिका येत्या काहीच दिवसांत निरोप घेणार आहे. असे असताना गेल्या काही दिवसापांसून मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांच्या पत्थ्यावर पडताना दिसत आहेत. मालिकेतली मुख्य पात्र अमुल्या आणि वेदांत या जोडीवर प्रेक्षक प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत असून मालिकेला आता एक रंजक वळण देण्यासाठी आणखी एका पात्राची जबरदस्त … Read more

‘तिने Insta ब्लु टिक विकत घेतलीये..’ म्हणणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री; म्हणाली, ‘मी पैसे देऊन..’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपट, नाटकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवणारी हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कधी कॉमेडी रील, कधी मालिकेचे BTS व्हिडीओ तर कधी गाणे गातानाचे व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामला सत्यापित अकाउंट म्हणून ब्ल्यू टिक बॅज मिळाला आहे. … Read more

‘वेड’ चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; 1446 छत्र्यांचा वापर करून रचली कलाकृती

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सत्या आणि श्रावणी यांच्या प्रेमाचं ‘वेड’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलं. प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला. अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित अभिनित आणि जिनिलियाचं मराठी सिने विश्वातील पदार्पण प्रभावी कामगिरी करताना दिसले. या लोकप्रिय चित्रपटाचा येत्या २० ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. यानिमित्त स्टार … Read more

जसराज- आनंदीचे सूर जुळले; गुपचूक कोर्टात उरकलं लग्न

Jasraj Anandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठा संगीत कलाविश्वात प्रख्यात गायिका आनंदी जोशी आणि गायक जसराज जोशी यांनी चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदी आणि जसराज यांच्या नात्याबद्दल बोलले जात होते. अखेर जसराज आणि आनंदीने त्यांच्या नात्याला आता अधिकृत नाव दिले आहे. नुकतेच या दोघांनी कोर्टात गुपचूप पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो … Read more

‘औक्षण.. आशीर्वाद आणि खूप प्रेम..’; MHJ’च्या टीमने साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ … Read more

‘हा महिलांनी नव्हे तर पुरुषांनी पहायचा सिनेमा..’; ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला आहे. दमदार कामगिरीसह ७० कोटींचा आकडा पार करणारी कमाई करत या चित्रपटाने एक वेगळाच विक्रम केला आहे. या चित्रपटाला तमाम महिला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मात्यांनी आता हा चित्रपट पुरुषांनी देखील पहावा असे आवाहन केले आहे. … Read more

हातात बॅग, शूज, कपडे.. सामानासकट भरकटलेल्या अवस्थेत दिसला अभिनेता; नेटकरी म्हणाले, ‘घरातून हाकललं का..?’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा खरंतर कॉमिक अभिनेता म्हणून प्रकाश झोतात आला. पण तो केवळ एक अभिनेता नव्हे तर तो एक उत्तम इंटरटेनर आहे. मालिका, चित्रपट, कॉमिक शो आणि सिरीज सारख्या विविध माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. दोस्तांचा दोस्त अशी कुशलची एक वेगळीच दुनिया आहे. अलीकडेच त्याने फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केलेली … Read more