‘या’ दिवशी सुरु होणार मुक्ता- सागरच्या ‘प्रेमाची गोष्ट’; तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली. मध्यंतरी तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी मालिकेचा … Read more

हा माणूस माथेफिरू..!! ‘लेकीचं कौतुक आणि वडिलांची…’; किरण मानेंनी सिद्धी शरद पोंक्षेसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Sharad Ponkshe_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी परदेशातून वैमानिक होण्याचे शिक्षण घेऊन परतली आहे. ती वैमानिक झाल्याचा आनंद शरद पोंक्षे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान सिद्धीचं कौतुक करताना शरद पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळे त्यांच्यावर टीका झाली. अशातच किरण माने … Read more

बॉलिवूडकरांच्या गर्दीत उठून दिसली मराठमोळी क्षिती; करण जोहरने केलं कौतुक

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. चित्रपटाची भव्यता, गाणी, दिग्दर्शन, दिग्गज कलाकार अशा सगळ्याच जमेच्या बाजू असल्याने या चित्रपटाला चारचाँद लागले आहेत. चित्रपटातील नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा. या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा … Read more

मराठी भाषेचा राजधानीत गौरव होणार; ‘मधुरव- बोरु ते ब्लॉग’चा 25’वा प्रयोग दिल्लीत रंगणार

Madhurav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘राजभवन’, ‘गेट वे ऑफ इंडिया’ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये सादर केला गेलेला एकमेव मराठी नाट्य प्रयोग ‘मधुरव- बोरु ते ब्लॉग’ आता थेट दिल्ली येथे सादर होणार असून त्याचे निमित्त ही ख़ास आहे. ‘मधुरव बोरु ते ब्लॉग’चा २५’वा (रौप्य महोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे येत्या ३ ऑगस्टला सायंकाळी ६:३० वाजता होणार असून … Read more

विदर्भातील जंगलाच्या ‘टेरिटरी’ची कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार; पहा पोस्टर

Territory

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जंगलांचे प्रमाण कमी झाल्याने वाघ, बिबट्या यांच्यासारखे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची अशीच थरारक कहाणी १ सप्टेंबरपासून उलगडणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री … Read more

शरद पोंक्षेंच्या लेकीची गगनभरारी; परदेशात घेतले पायलट होण्याचे प्रशिक्षण

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच परखड स्वभाव आणि थेट विधाने करण्यासाठी ओळखले जातात. काही ना काही विषयांवर त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण आज त्यांच्या लेकीमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु झाली आहे. आपण अनेकदा पहिले असेल कि दिग्गज कलाकार मंडळींची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतात … Read more

‘बाईपण का भारी हे दाखवायला लोक पुढे येतील, पण पुरुषांचं भारीपण…’; अशोक सराफ यांचं वक्तव्य चर्चेत

Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिस, सोशल मीडिया, प्रसार माध्यमे सर्वत्र केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या रिलीजला चार आठवडे होऊन गेले पण प्रतिसाद अजूनही दणदणीत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसतोय. इतकंच काय तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दरम्यान प्रेक्षक. समीक्षक … Read more

एक असंही BREAK- Up!! संतोष जुवेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, ‘तिने माझ्या अंगावर पैसे फेकले..’

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामनांवर राज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा विविध लूक, व्हिडीओ, किस्से आणि अनुभव सांगत तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. आजपर्यंत संतोषने चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नेहमीच त्याची काही ना काही कारणांमुळे चर्चा असते. अलीकडेच एका वाहिनीला त्याने मुलाखत … Read more

‘चिपळूण आमचं गाव रे..’; ओंकार भोजनेच्या कवितेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Onkar Bhojane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने प्रेक्षकांना अत्यंत लाडका आहे. हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार ‘फु बाई फु’च्या नव्या पर्वात दिसला. त्यानंतर ओंकार मराठी चित्रपटात देखील झळकला होता. सध्या तो भाऊ कदमसोबत ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. आपण सारेच जाणतो कि, ओंकार भोजने काव्यप्रेमी आहे. त्याच्या … Read more

‘तुझं कौतुक थांबु नये..’; बायकोचा सिनेमा पाहून हेमंतने व्यक्त केला अभिमान

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपट शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रीमिअर शोसाठी क्षिती तिचा पती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेला घेऊन गेली होती. हेमंतने … Read more

‘आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी..; हेमांगीने शेअर केला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फॅमिली फोटो आणि लहानपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. उत्तम अभिनयासह परखड स्वभाव आणि थेट व्यक्त होण्यासाठी तिला जास्त ओळखले जाते. अनेकदा सोशल मीडियावर ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना वाचा फोडताना दिसते. तर अनेकदा मनातील सल, दुःख, आठवणी शेअर करताना भावनिक होताना दिसते. अशीच एक बालपणीची आठवण … Read more

स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेची घोषणा; तेजश्री प्रधान येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या बऱ्याच काळापासून कला विश्वापासून लांब आहे. झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’मधून तिने साकारलेली जान्हवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इतकेच काय तर याच वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तिने शुभ्रा हे पात्र साकारले होते आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू … Read more

दमदार शुक्रवार!! ‘बाईपण भारी देवा’ थिएटरमध्ये मोफत पाहता येणार; कधी आणि कुठे..? लगेच जाणून घ्या

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजतो आहे. दिनांक ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार आठवडे होऊनही थिएटरमध्ये कल्ला करतोय. या चित्रपटाचं सर्वाधिक क्रेझ महिला वर्गात पहायला मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ पहायला आजही प्रत्येक शोला थिएटरमध्ये गर्दी होतेय.अनेकदा चित्रपटाची तिकीटंदेखील मिळत नसल्याचे … Read more

OTT’ वरील काल्पनिक हिंसाचाराविषयी एव्हढी चिंता..?; सुव्रत जोशीने प्रेक्षकांना विचारलेले ‘ते’ प्रश्न चर्चेत

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा … Read more

‘यज्ञसेनी’ कादंबरीवर आधारित ‘द्रौपदी’ सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Draupadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी रुक्मिणी मैत्रासोबत “द्रौपदी” हा चित्रपट तयार करणार असून बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान, थिएटर लीजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित बंगाली बायोपिक नंतर हा त्यांचा दुसरा मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची जादुई कथा रुपेरी पडद्यावर … Read more