हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री चेतना भट्ट सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून चेतनाने वेगवेगळ्या प्रहसनांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या चेतना तिच्या नवऱ्यासोबत मालदीव फिरायला गेली आहे. तिने सोशल मीडियावर या ट्रीपमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री चेतना भट कायम सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो. मजेशीर रिल्स व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. पण यावेळी चेतनाने व्हॅकेशनचे फोटो शेअर करत चाहत्यांना मालदीवची झलक दाखवली आहे. दरम्यान चेतनाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर नवऱ्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने ‘मालदीव डायरीज’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. चेतना तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये मस्त धम्माल करताना दिसते आहे.
अभिनेत्री चेतना भटच्या नावरचे नाव मंदार चोळकर असून तोदेखील कलाविश्वाचा एक भाग आहे. मंदार गीतकार असून आतापर्यंत त्याने ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’ सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.
आपल्या व्यस्त शेड्युलमधून चेतना आणि मंदार यांनी एकमेकांसाठी वेळ काढत थेट मालदीव गाठलंय आणि एकमेकांसोबत हे व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. या फोटोमध्ये चेतना आणि मंदार स्विमिंग पूलमध्ये उभे आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांचा आनंद दर्शवत आहे.