‘तू असशील.. आणि आहेस’; आईच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छाया कदम हे मराठी सिनेसृष्टीतील गाजलेले नाव आहे. मराठीचं नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमा तसेच विविध आशयाच्या सिरीजमध्ये छाया यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. छाया कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. छाया कदम यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी ही पहिलीच पोस्ट शेअर केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

अभिनेत्री छाया कदम यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आईच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. छाया कदम यांची आई सुहासिनी रघुनाथ कदम यांचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आई आज दोन आठवडे झाले तुला जाऊन..? नाही अगं, तू आहेस आणि असशील. कायमच माझ्यासोबत. तू असशील मुंबईतल्या घरातील तू जपलेल्या समई आणि जात्यात. तू असशील गावातल्या अंगणातील चाफ्याच्या झाडात. आणि तू असशील, तूच मला दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यात आणि माझ्या कामात’.

छाया कदम यांनी शेअर केलेली ही भावनिक पोस्ट अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर कमेंट करत छाया कदम यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. यादेखील अनेकदा छाया यांनी आपल्या आईसोबतचे फोटो तसेच काही व्हिडीओ, जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांचे आणि त्यांच्या आईचे नाते फार घट्ट आणि जवळचे होते. त्यामुळे आईचे छत्र हरपल्यानंतर छाया कदम यांच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला.छाया कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’ यासारख्या मराठी तर ‘सिंघम रिटर्न्स’, ‘अंधाधून’, ‘झुंड’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ सारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.