चिन्मय उद्गीरकरच्या नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘नो मेकअप लूक’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपली भूमिका उत्तमरित्या वठवणे किती महत्वाचे असते काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे भूमिकेसाठी हि कलाकार मंडळी काहीही करायची तयारी दाखवतात. ‘दिल मलंगी’ या आगामी सिनेमाच्या नायिकेने देखील आपल्या भूमिकेसाठी ‘नो मेकअप लूक’ साकारला आहे. हि अभिनेत्री म्हणजे नक्षत्रा मेढेकर. ‘दिल मलंगी’ या चित्रपटात चिन्मय उदगीरकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत तर नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशी या मुख्य महिला व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. या भूमिकेसाठी नक्षत्राने ‘नो मेकअप लूक’ करण्याचे धाडस केले आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळी प्रेमकथा करायला मिळत असल्याचे चिन्मयने म्हटले आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Chinmay Udgirkar (@chinmayudgirkar)

‘दिल मलंगी’ हा एक ऍक्शन फँटसी ड्रामा आहे. याची कथा स्वप्नाळू अन सरळमार्गी असलेल्या सतेज या तरुणाभोवती फिरते. कॉलेजमध्ये तो एका मुलीवर प्रेम करू लागतो. जी त्याच्यासोबत निव्वळ टाईमपास करत असते हे लक्षात आल्यावर त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. करिअरसाठी तो मुंबई गाठतो आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘ग्लोबल ट्रान्स मिडिया’ जाहिरात एजन्सीच्या हर्षवर्धन मराठेंचे मन जिंकतो. मात्र मुंबईतील थकवणारा प्रवास न रुचल्याने तो शहर सोडायचा निर्णय घेतो आणि हि बाब खटकल्याने हर्षवर्धन सतेजला आणखी एक संधी देतात. ऑफिसच्या आलिशान रेस्ट हाऊसमध्ये सतेजचा मुक्काम हलवला जातो आणि इथून त्याच्या आयुष्याचे चक्र फिरते. ते कसे हे पाहण्यासाठी सिनेमा पहावा लागणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात आली आहे. हि त्यांची पहिलीच निर्मिती आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल परब करत आहेत. चित्रपटाचा मुहूर्त अलीकडेच मुंबई, मढ येथे संपन्न झाला. यावेळी चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, विनम्र भाबल, निर्माते रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले, प्रमोद मुरकुटे आणि दिग्दर्शक सुनिल परब यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चिन्मय उद्गीरकर म्हणाला, ‘मी अनेक मालिकांमधून, चित्रपटातून काम केलंय. लव्हस्टोरीमध्ये काम केलंय पण या चित्रपटातून दाखवलेली लव्ह स्टोरी माझ्या करिअरमधली पहिली हटके स्टोरी आहे. अशक्य वाटावी अशी ही प्रेमकथा आहे’.

तर नक्षत्रा मेढेकर म्हणाली, ‘मी तशीही कमी मेकअप करते. या चित्रपटात माझी भूमिका अशी आहे की ‘नो मेकअप लूक’ मला करायला मिळणार आहे. जे माझ्या मनासारखं घडतंय’. शिवाय मीरा जोशी म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच रोमान्स करणार आहे. यामुळे माझी पडद्यावरची इमेज नक्कीच ब्रेक होणार’.