दीपाली पानसरेचं स्टार प्रवाहवर कमबॅक; ‘आई कुठे काय करते’नंतर ‘या’ मालिकेत झळकणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना हे पात्र निगेटिव्ह म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. कथानकानुसार पुढे या पात्रात सकारात्मक बदल झाले. सध्या मालिकेत हि भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे. मालिकेत सुरुवातीला हि भूमिका अभिनेत्री दीपाली पानसरे साकारत होती. मात्र पुढे जाऊन तिने मालिकेला नारळ दिला. यानंतर आता स्टार प्रवाहवर येऊ घातलेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. इशा आणि अक्षरव्यतिरिक्त अभिनेत्री किशोरी अंबिये आणि दीपाली पानसरेदेखील या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये इशा केसकर आणि किशोरी अंबिये यांच्या भूमिकांची झलक पहायला मिळाली. यांनतर आता समोर आलेल्या माहितीनुसार ‘आई कुठे काय करते’ फेम दीपाली पानसरे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ हि मालिका येत्या २० नोव्हेंबर २०२३पासून स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून ‘आई कुठे काय करते’ हि मालिका सोडल्यानंतर पुन्हा एकदा दीपाली स्टार प्रवाहसोबत काम करताना दिसणार आहे. दरम्यान, दीपालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई तुझा आशीर्वाद’ या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका गाजली होती. शिवाय ‘देवी’ आणि ‘देवयानी’सारख्या अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.