पाऊस.. मका आणि मैत्रिणी!! दीपाली सय्यद यांची बेधुंद पावसाळी ट्रिप; VIDEO झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना दीपाली सय्यद अभिनयविश्वात फार सक्रिय नसल्या तरी चर्चेत असतात. कारण अभिनय विश्वापेक्षा जास्त दीपाली सय्यद राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दीपाली सय्यद यांची चर्चा आहे. अशातच धुंद पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेताना दीपाली सय्यद स्पॉट झाल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा त्या विविध फोटो, व्हिडीओ आणि विविध विषयांवरील पोस्ट शेअर करताना दिसतात. सध्या पावसाळा सुरु आहे आणि या ऋतूचा प्रत्येकजण चाहता आहे. पावसाळ्यात सगळेच आपल्या फॅमिली आणि दोस्त मंडळींसोबत फिरण्याचा प्लॅन करतात. तर अभिनेत्री दीपाली सय्यद देखील पावसाचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्याला गेल्या होत्या. दरम्यान त्यांनी लोणावळ्यातील निसर्गरम्य वातावरण, मनालाही ओलेचिंब करणारे पावसाचे थेंब, धुकं आणि कणीस म्हणजेच मक्याचा आनंद लुटला.

दीपाली यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ३ व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एकात दीपाली त्यांच्या मैत्रिणींबरोबर छान डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला ‘मी, पाऊस आणि मित्र’ असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत त्या लोणावळ्यातील पावसादरम्यान झालेले सुंदर निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करताना दिसत आहेत.

याशिवाय दीपाली यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात त्या मक्याचे कणीस भाजताना दिसत आहे. भर पावसात एका छोट्याशा दुकानात त्या मस्त मका भाजताना दिसत आहेत आणि १० रुपयाला एक असंही बोलताना दिसत आहेत. दीपाली त्यांच्या मैत्रिणीला मका खाण्यासाठी हवा का? असेही विचारात आहेत. या व्हिडिओसोबत ‘प्रेम, प्रेम अन् फक्त प्रेम. प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.