हक्काचं घर असूनही भाड्याच्या घरात का राहतेस..? धनश्रीने सांगितलं कारण.. म्हणाली,


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब हि भूमिका साकारत अभिनेत्री धनश्री कडगांवकर प्रकाशझोतात आली. या भूमिके तिला प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात ओळख मिळवून दिली. यानंतर धनश्रीने मधल्या काळात प्रेग्नेंसी ब्रेक घेतला होता आणि आता ती झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत झळकते आहे. करिअरसोबतच धनश्री वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करताना दिसते आहे. अलीकडेच तिने मुंबईत नवीन घर खरेदी केलं आहे. आपण तरीही ती अजूनसुद्धा भाड्याच्या घरात राहते आहे. याचे कारण काय ते स्वतः धनश्रीने सांगितले आहे.

अभिनेत्री धनश्री कडगांवकरने गणेशोत्वामध्ये ठाण्यात दोन नवे फ्लॅट खरेदी केले. सध्या या फ्लॅट्सच्या इंटेरिअरचे काम सुरु आहे. आपल्या घराचे व्हिडीओ तसेच फोटो धनश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत नव्या घरात लवकरात लवकर राहायला जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.हा व्हिडीओ तिने इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला होता. घर खरेदी करूनही धनश्री अजून भाड्याच्या घरात का राहतेय..? असा सवाल तिच्या चाहत्यांनी केला. याचं उत्तर तिने या व्हिडिओतून दिले आहे.

धनश्री म्हणतेय कि, ‘मी नुकतीच माझ्या घरी जाऊन आले. आम्ही इंटेरिअरच्या अनेक गोष्टी या ठरवल्या आहेत. पण हे फार धकाधकीचं आहे. प्रत्येकवेळी तिकडे गेल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर बोलत असतो. मी या सर्व प्रक्रियेचा आनंद घेतेय. याचा फार थकवाही जाणवतोय.मी अशी आशा करतेय की लवकरात लवकर माझं घर तयार होईल आणि मी तिथे राहायला जाईन. कारण आता सध्या मी भाड्याच्या घरात राहते. माझ्या घराचं भाडं खूप जास्त आहे. त्यामुळे जर माझं नवीन घर लवकर तयार झालं, तर मला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे माझं घराचं भाडंही वाचेल’.