‘लक्ष्मीच्या पावलांनी’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील हा शेवटचा महिना सुरु आहे आणि या महिन्यात अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहे. प्रसाद जवादे- अमृता देशमुख, पियुष रानडे- सुरुची अडारकर हे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. तर येत्या काही दिवसात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी हेसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत.

यातच आता आणखी एका मराठी अभिनेत्याने शुभमुहूर्त गाठला अनु लग्नाचा बार उडवला आहे. मालिका विश्वातील ओळखीचा चेहरा ध्रुव दातार आणि कोरिओग्राफर अक्षता तिखे यांचा नुकताच विविह सोहळा पार पडला आहे. अभिनेता ध्रुव दातार आणि कोरिओग्राफर अक्षता तिखे यांनी शुक्रवार, १५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली आणि सुखी संसाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नासाठी दोघांनीही खास पारंपरिक लूक केला होता आणि कलर मॅच केल्यामुळे ही जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. ध्रुवने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्या आधीच्या विधींचेदेखील फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले होते. ज्यामध्ये केळवण, ग्रहमख, हळद आणि संगीत या कार्यक्रमांचा समावेश होता. यांनतर आता लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ध्रुव आणि अक्षताच्या लग्नाला दातार अन तिखे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्र मैत्रिणी उपस्थित होते. अत्यंत धुमधडाक्यात हा विवाह सोहळा पार पडला. विधी, फेरे आणि रिसेप्शनसाठी ध्रुव- अक्षताने खास पेहराव केले होते. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो- व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अभिनेता ध्रुव दातारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत त्याने शिल्पीचा खास मित्र विक्रम हि निगेटिव्ह भूमिका साकारली होती. यानंतर आता तो स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मध्ये राहुल हे निगेटिव्ह पात्र साकारतो आहे.