यायलाचं लागतंय!! प्रसाद- अमृताच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का..? आमंत्रणात दडलीये खास आठवण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचं थाटामाटात लग्न पार पडणार आहे. गेल्या नाईक दिवसांपासून या जोडीच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. अखेर आता त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. ही पत्रिका एका खास थीमवर आधारलेली आहे आणि ही थीम आहे बिग बॉसची.

अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाची डिजिटल निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. अजी ‘बिग बॉस’च्या थीमवर आधारित आहे. या पत्रिकेत अमृताने तयार केलेल्या कवितेचादेखील समावेश आहे. ही कविता पुढील प्रमाणे आहे,

समांतर असा सुरु होता त्या दोघांचा प्रवास..
अनपेक्षित क्षणी आला सक्तीचा सहवास!!
भिन्न स्वभाव, भिन्न विचार.. प्रेमावर मात्र दृढ विश्वास..
आधी त्याने घेतला हातात हात, मग तिने सोडली नाही कधीच साथ!!
दोन मनांचा सुरु झाला होता experimental संवाद
मात्र permenant सुखी जीवनासाठी हवेत आता..
फक्त तुमचे आशीर्वाद!!

अमृता आणि प्रसादच्या लग्नाची ही निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. येत्या शनिवारी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांचा एका ओपन रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आणि साध्या वतसेच पारंपरिक पद्धतीने दोघांची लग्न करण्याची इच्छा आहे. अद्याप लग्नस्थळाबाबत गौप्य राखण्यात आले आहे. नुकताच दोघांचा ग्राहमख विधी पार पडला आणि त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.