‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेच्या दिग्दर्शकाचे निधन; कलर्स मराठीने वाहिली श्रद्धांजली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन करीत प्रेक्षकांचे उत्तम कलाकृती देणारे दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मराठी कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेश नामजोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेता शशांक केतकरचादेखील समावेश आहे.

दिग्दर्शक उमेश नामजोशी यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध वाहिनी कलर्स मराठीने दिली. गुरुवारी दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कलर्स मराठी वाहिनीने उमेश नामजोशी यांचे निधन झाल्याची माहिती देणं त्यांना श्रद्धांजली वाहिली. अद्याप त्यांच्या निधनाचे कां अस्पष्ट असून ओसशल मीडियावर नेटकरी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना दिसत आहे. कलाविश्वात उमेश नामजोशी यांच्या निधनाची बातमी पसरताच सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे.

अभिनेता शशांक केतकरनेदेखील त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये उमेश नामजोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या फोटोसोबत त्याने फक्त ‘उमेश सर’ असं लिहून ही स्टोरी पोस्ट केली आहे. दरम्यान, उमेश नामजोशी यांनी अनेक मराठी मालिका तसेच चित्रपटांचे दिग्दर्शक केले होते. स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’, सोनी मराठीवरील ‘सावित्रीज्योती’ शिवाय कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वोत्तम मालिका ठरल्या.