हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या जोडीने काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याची कबुली दिली. यानंतर प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देखील त्यांनी स्वतःच दिली. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या केळवणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून त्यांचा साखरपुडा झाल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मुग्धा पिवळ्या- लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. तर प्रथमेश मरून रंगाचा सदरा आणि डोक्यावर टोपी अशा वेशात दिसतो आहे. दोघांचे पारंपरिक वेशभूषेतील हे रोमँटिक फोटो सोशोल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. जे पाहून त्यांचा साखरपुडा पार पडल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. पण खरंतर मुग्धा आणि प्रथमेश यांचा साखरपुडा झालेला नाही. याबाबत स्वतः मुग्धाने एका नामवंत वाहिनीला मुलाखत देत सांगितले.
मुग्धा वैशंपायनने सोशल मीडियावर प्रथमेशसोबतचे पारंपारिक वेशभूषेतील रोमँटिक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले ‘वाङ्निश्चय’ असे लिहिले आहे. ज्यामुळे चाहते संभ्रमित झाले. पण ‘वाङ्निश्चय’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘आमचं ठरलं’ असा आहे. साखपुड्याबाबत पसरलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना मुग्धा वैशंपायनने स्पष्ट सांगितले कि, ‘प्रथमेश आणि माझा साखरपुडा झालेला नाही’. पण तरीही मुग्धा आणि प्रथमेशचा वाङ्निश्चय कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला याचे नेटकऱ्यांनी कौतुक केले असून हे फोटो व्हायरल होत आहेत.