‘अंकुश’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिकाची सिनेविश्वात एंट्री


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत ‘अंकुश’ या चित्रपटाची निर्मिति झाली असून येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आता लवकरच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. ‘अंकुश’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले हे मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.

अतिशय रोमहर्षक साहसदृश्य आणि एक आगळी वेगळी प्रेमकहाणी यांचा मिलाप आणि त्यातून सामाजिक संदेश या चित्रपटात असणार आहे, तगडी स्टार कास्टिंग आणि दिग्गज तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या पहिल्याच निर्मितीत राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी एक बिगबजेट चित्रपट निर्मित केलेला आहे, या चित्रपटाबरोबर ते निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत, केवळ एकच चित्रपट न करता मराठी, हिंदी सिनेसृष्टीत वेगवेगळे मनोरंजक आणि बिगबजेट चित्रपटांची निर्मिती करण्याचे प्रसिद्ध निर्माते श्री. राजाभाऊ आप्पाराव घुले यांचा मनोदय आहे.

ओमकार फिल्म्स क्रिएशन अंतर्गत नव्याने सुरु होणाऱ्या निर्मितीत अनेक होतकरू आणि सुप्रसिद्ध अशा कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा मानस निर्मात्यांचा असून ‘अंकुश’ या चित्रपटाद्बारे याची सुरुवात झाल्याचं निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांगितले.

‘अंकुश’ या आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटात निर्मात्यांनी दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध साहस दृश्य दिग्दर्शक, हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक यांची बहरदार नृत्य असून त्याचे चित्रीकरण परदेशात करण्यात आले आहे, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक तसेच मराठी सिनेसृष्टीतील तगड़ी स्टारकास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येण्यास आता सज्ज झाले आहेत.