स्टार प्रवाहवर ईशा केसकर येतेय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’; नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय वाहिनी आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे हि मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा रिमेक असूनही प्रेक्षकांकडून या मालिकेला पसंती मिळते आहे. अशातच आता आणखी एक नवी मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु होते आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ असे या मालिकेचे नाव आहे.

स्टार प्रवाह येऊ घातलेलय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हि मालिका येत्या २० नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेत्री किशोरी अंबिये झळकल्या आहेत. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. असेही म्हटले जात आहे कि, हि मालिका बंगाली आणि हिंदी भाषेतील एका मालिकेचा रिमेक आहे.

तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनंतर आता इशा केसकरची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिकासुद्धा रिमेक मालिका असल्याचे समोर आले आहे. या मालिकेतून ईशा केसकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. तिचे चाहते या नव्या मालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. ईशा केसकर आणि अक्षर कोठारीची ही नवी मालिका २० नोव्हेंबर २०२३ पासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.