हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या आठवड्याच्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंडळी हजार राहिली होती. यामध्ये बड्या बड्या नेत्यांसह, कलाकार मंडळींचा देखील समावेश होता. यात बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वातील कलाकार दिसून आले पण मराठी कलाकारांपैकी कुणी या सोहळ्याला उपस्थित नव्हतं. एखाद दूसरा असेल पण दिसून आला नाही. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला.
हा दिवस हिंदूंसाठी एखादा सोहळा ठरला. अशातच मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने सर्वांना हैराण करून सोडले आह. ‘स्वतःला हिंदू म्हटल्यावर बऱ्याच लोकांना वाईट वाटतं’, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे गश्मीर याच माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. हि पोस्टदेखील त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती.
ज्यात त्याने लिहिलं होत कि, ‘आम्ही अत्यंत धार्मिक माणसं आहोत अन् प्रत्येक धर्माला आम्ही आपलं मानतो. पण जेव्हा आम्ही स्वतःला हिंदू म्हणवतो तेव्हा मात्र कित्येकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही फार विचित्र गोष्ट आहे’. सोशल मीडियावर त्याने आपल्या मनातील खंत व्यक्त केल्यानंतर आणखी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने ‘मी हिंदू असल्याचा मला पूर्ण अभिमान आहे.. ‘असे नमूद केले होते. गश्मीरची हि पोस्ट बरीच व्हायरल झाल्याचे दिसून आले.