‘… लोक म्हणतात मी उद्धट आहे’; चाहत्याच्या ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. मालिका, सिरीज, चित्रपटांच्या माध्यमातून गश्मीरने अभिनेता म्हणून एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. इतकेच काय तर गश्मीर उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याची स्वतःची डान्स अकॅडेमी आहे आणि तो अनेकदा अकॅडमी मधील व्हिडीओ शेअर करत असतो. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातही गश्मीरचं नाणं खणखणीत वाजतंय. त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रीत त्याचे चाहते आहेत. ज्यांना त्याच्याविषयी जाणून घेण्यात रस असतो.

गश्मीर सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर फार सक्रिय असतो. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तो स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे लासखा वेधून घेतो. अलीकडेच त्याने ‘Ask Gash.. For Sometime’ असे सेशन सुरु केले आहे. दार रविवारी तो आपल्या चाहत्यांसोबत हे सेशन करतो. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तर देताना दिसतो. कालच्या रविवारी त्याने हे सेशल केले असता अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. ज्याची गश्मीरने मोकळेपणाने उत्तरं दिली.

यावेळी गश्मीरच्या एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला कि, ‘तू इतका विनम्र कसा आहेस..?’ या प्रश्नाचे उत्तर देताना गश्मीर महाजनी म्हणाला कि, ‘बघा ना, इतका विनम्र असूनही लोक म्हणतात की मी उद्धट आहे’. त्याच हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. गश्मीर महाजनीचे वडील अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर मुलगा म्हणून तो फार ट्रोल झाला होता. त्यानंतर जवळपास २ महिने त्याने ब्रेक घेतला होता. अखेर त्याने पुन्हा सोशल मीडियावर कमबॅक केलं आणि ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून कामाला सुरुवात केली आहे. लवकरच तो एका ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे.