हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे आज २५ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न गाठ बांधणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करताना गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा आहे. नुकताच तिचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या अफेअरची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून होती आणि अखेर आता तिचा पार्टनर कोण हे समोर आलं असून लवकरच ते लग्न करत आहेत. गौतमीने ‘यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय… नवी सुरुवात’ असं लिहित मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला. इतकेच नव्हे तर काल गौतमी आणि स्वानंद यांचा हळदी समारंभ देखील तितकाच जल्लोषात पार पडला. यानंतर आता रविवारी रात्री त्यांचा संगीत सोहळा पार पडला.
गौतमीच्या संगीत सोहळ्यात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र मंडळी सामील झाले होते. गौतमीची सख्खी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या स्टोरीवर गौतमी आणि स्वानंद यांचा रोमँटिक डान्स करताना व्हिडीओ शेअर केला आहे. याचा व्हिडीओ ‘सिने अपडेट्स’ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच संगीत सोहळ्यात गौतमीच्या आईने ‘आओ हुजूर तुमको’ हे गाणं गायलं. या खास सोहळ्यात गौतमीने व्हाईट रंगाचं ऑफ शोल्डर लॉन्ग फ्रॉक आणि स्वानंदने व्हाईट शर्टवर राखाडी जॅकेट परिधान केलं होतं.