Gautami Deshpande | हळद लागली! गौतमी आणि स्वानंदचे हात झाले पिवळे, पाहा फोटोस


Gautami Deshpande | अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहेत.त्या दोघांनी नुकतेच त्यांच्या मेहंदीचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता नुकतेच दोघांचेही घरी लग्नविधीला सुरुवात झाली आहेत. आणि स्वानंद आणि गौतमी यांच्या हळदीचे फोटो समोर आलेले आहे.

सारंग साठे यांनी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो शेअर केलेले आहे. हे फोटो शेअर करून त्यांनी “कुंकू हसलं हळद पण हसली” असं कॅप्शन दिलेले आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप खूप दिसत आहे.

हेही वाचा – Navardev Teaser | कधी भेटणार नवरदेवाला नवरी?, ‘नवरदेव’ चित्रपटाचा उत्साह वाढणारा टिझर रिलीझ

गौतमी आणि स्वानंद दोघेही हळदीच्या लूक मध्ये दिसत आहेत. गौतमीने पिवळ्या रंगाचा लहंगा घातलेला आहे. आणि फ्लोरल ज्वेलरी घालून ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचप्रमाणे स्वानंदने देखील पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे. त्याचप्रमाणे दोघांनी डोळ्यावर गॉगल लावलेले दिसत आहे. ते दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.

स्वानंद तेंडुलकर हा देखील एक अभिनेता आहे. तसेच मराठी मधील डिजिटल चैनल भाडीपाचा तो बिजनेस हेड आहे. ते दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना भेट करत होते. परंतु त्यांनी त्यांच्या रिलेशन बाबत कोणालाही काहीच कल्पना दिली नाही. आता ते दोघे लग्न करणार आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. अनेक जण त्यांच्या फोटोवर कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.