Gautami Deshpande Marriage – झालं हो झालं!!! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा थाटामाटात विवाह संपन्न; पहा फोटो


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Gautami Deshpande Marriage) ‘माझा होशील ना..’ म्हणत अभिनेत्री गौतमी देशपांडे अखेर आज स्वानंद तेंडुलकरची झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती आणि गेल्या काही दिवसांत ती लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. अखेर आज अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. नुकतेच तिच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या नाव दांपत्यावर शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. आज २५ डिसेंबर २०२३ रोजी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांनी शुभमुहूर्त साधत आपल्या सहजीवनाची सुरुवात केली आहे. (Gautami Deshpande Marriage) कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रीणींच्या उपस्थिती त्यांनी लग्न केले. गौतमीच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी देखील उपस्थित होते. आपल्या आयुष्यातील हा खास दिवस साजरा करताना गौतमी आणि स्वानंदने केलेले लूक फारच लक्षवेधी ठरले.

गौतमी आणि स्वानंदने आपल्या लग्नात एकमेकांना मॅचिंग असे कपडे परिधान केले आहेत. (Gautami Deshpande Marriage) सोनेरी रंगाचा काठ असलेली ऑफ व्हाईट साडी आणि लाईट पिंक शेडमध्ये ब्लाउज अन शेला यासह सुंदर मोत्याचे दागिने परिधान करत गौतमीने लूक पूर्ण केलेला आहे. तर स्वानंदने गौतमीच्या साडीला मॅचिंग रंगात जरी वर्क असलेला ऑफ व्हाईट कुर्ता आणि त्यावर लाईट पिंक शेला घेतला होता.

Gautami Deshpande Marriage

दोघांच्याही मोत्याच्या मुडावळ्या आणि गौतमीच्या मंगळसूत्राची डिझाईन सध्या लक्षवेधी ठरली आहे. गौतमीचा पती स्वानंद तेंडूलकर हा एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. जो ‘भाडिपा’ या प्रसिद्ध युट्यूब चॅनलमध्ये सक्रिय असून तो डिजीटल क्रिएटर म्हणून कार्यरत आहे.