सप्तसूर म्युझिकच्या नव्या आयटम सॉन्गमध्ये झळकली गौतमी पाटील; पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक जॉनरच्या गाण्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. यामध्ये ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची अवघ्या महाराष्ट्रभर हवा आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत प्रेक्षकांना वेड लावताना दिसते आहे. सप्तसूर म्युझिकच्या या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी चीझ लई कडक या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही.

‘चीझ लई कडक’ या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमकं काय करतेय..? हे जाणून घेण्यासाठी हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे. मात्र ‘चीझ लई कडक’ हे गाणं प्रेक्षकांना कडक वेड लावणार याची मेकर्सना पूर्ण खात्री आहे. हे एक आयटम साँग असून यंदाचं आयटम सोंग ऑफ द ईअर ठरणार असेही त्यांना वाटते आहे. आता मेकर्सची खात्री प्रेक्षक सत्यात उतरवणार का..? हा मोठा सवाल आहे.