सून असावी अशी!!! देशमुखांच्या सुनेने जपली अभ्यंगस्नानाची परंपरा; नेटकऱ्यांनी केले कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हि कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. जिने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. केवळ बॉलिवूड नव्हे तर मराठी सिनेविश्वातदेखील या जोडीने कायम आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री इतकी कमाल आहे की या जोडीची कायम चर्चा असते. अमराठी असूनही जिनिलियाने देशमुख घराण्याची सून म्हणून आपल्या जबाबदाऱ्या कायम पार पाडल्या आहेत. तिने मराठी संस्कृतीची उत्तम जाण करून घेतली आहे. नुकतीच तिने दिवाळीची पहिली पहाट अत्यंत सुंदररित्या साजरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जिनिलियाला ‘महाराष्ट्राची सून’ हा टॅग काही उगीच मिळालेला नाही हे तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. मराठी परंपरा, संस्कृती आणि सण जिनिलीया नेहमीच तिच्या मुलांना सोबत घेऊन व्यवस्थित साजरे करताना दिसते. शिवाय जिनिलिया आणि रितेश मिळून नवनवीन उपक्रमांचं आयोजनदेखील करतात. यंदा देशमुखांच्या घरच्या दिवाळीची एक खास झलक सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जिनिलियाने मुलांसह दिवाळी पहाट अगदी साग्रसंगीत साजरी केली आहे.

यावेळी जिनिलीयाने दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घातल. या व्हिडिओत जिनिलिया रियान आणि राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालताना दिसते आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. व्हिडीओमागे तिने ‘वेड’ चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय झालेले ‘सुख कळले…’ हे गाणे लावले आहे. जिनिलीयाने आपल्या दोन्ही लेकांना अभ्यंगस्नान घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते देशमुख कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. शिवाय जिनिलियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.