हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयासह रोमँटिक केमिस्ट्रीमुळे कायम चर्चेत अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे प्रेक्षकांचे लाडके कपल आहे. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाहीत. वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तिथे दिलखुलासपाने ते आपलं प्रेम व्यक्त करतात. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने नुकताच त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त जिनिलियाने आपल्या लाडक्या नवऱ्यासाठी एक खास रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. जी व्हायरल होत आहे.
अभिनेत्री जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर फार सक्रिय असते. केवळ कामाबाबत अपडेट नव्हे तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांची झलक ती या माध्यामातून शेअर करताना दिसते. जिनिलियासाठी १७ डिसेंबर हा दिवस जणू सोहळाच आहे. कारण या दिवशी तिच्या लाडक्या नवऱ्याचा म्हणजेच अभिनेता रितेश देशमुखचा वाढदिवस असतो. रविवारी रितेशने त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा केला आणि यानिमित्त जिनिलियाला पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली. तिने अधिकृत सोशल मीडिया एक सुंदर कॅप्शन लिहीत पोस्ट शेअर केली आहे.
हि पोस्ट शेअर करताना जिनिलियाने लिहिलं आहे कि, ‘जर रितेश देशमुख कोण आहे…? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर मी एवढंच म्हणेन, तो संपूर्ण जगातला खूपच चांगला मनुष्य आहे आणि तो फक्त माझा आहे. Happy Birthday नवरा!!!’ जिनिलीयाच्या या गोड आणि तितक्याच रोमँटिक पोस्टवर रितेशने कमेंट करत म्हटलंय कि, ‘आय लव्ह यू बायको… तू माझ्यासाठी काय आहेस याची कदाचित तुला कल्पनाही नसेल. तू माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनवलंस’. जिनिलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टवर अजूनही चाहते रितेशला शुभेच्छा देत आहेत.