हार्दिकने पूर्ण केली बायकोच्या पहिल्या मंगळागौरीची हौस; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतून प्रकाशझोतात आलेला अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची रील टू रिअल लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत राहिली. मालिकेनंतर हार्दिक आणि अक्षयाचा जीव खरोखर एकमेकांमध्ये गुंतला. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ तुफान व्हायरल देखील झाले. यानंतर आता नुकतीच हार्दिकने आपल्या बायकोची म्हणजेच अक्षयाची मंगळागौर साजरी करण्याची हौस पुरवली आहे. अत्यंत थाटामाटात या जोडप्याने मंगळागौर पूजन केले आहे.

जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची ही पहिली मंगळागौर मोठ्या थाटात साजरी केली आहे. त्याचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे स्वतः अभिनेत्री अक्षया देवधरने शेअर केले आहेत. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिने हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हार्दिक आणि अक्षयाचे दोन वेगवेगळे लूक दिसून येत आहेत. जे दोन्ही कमाल आहेत. एका फोटोत अक्षया आणि हार्दिक शिव शंकराच्या पिंडीवर फुल वाहताना दिसत आहेत. तर एका फोटो ते दोघेही हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.

इतकेच नव्हे तर काही फोटोंमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज देखील दिसून आला आहे. अक्षयाचा हिरव्या नऊवारी साडीतील लूक अत्यंत सुंदर आहे. या लूकसाठी तिने केलेला साजश्रृंगार हा पारंपरिक पद्धतीचा आहे. केसर गजरा, पारंपरिक दागिने, हातात हिरवा चुडा आणि नाकात नथ यासह तिने स्वतःचा लूक पूर्ण केला आहे. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचं धोतर परिधान केले होते. हे फोटो पोस्ट करताना अक्षयाने ‘मंगळागौर पुजन…’ आणि ‘ॐ पहिल्या मंगळागौरीची हौस!’ असे दोन कॅप्शन दिले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.