झी मराठीवर ‘राणा दा’चं कमबॅक; नव्या कार्यक्रमातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ हि मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या कार्यक्रमातून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. मालिका संपून बरीच वर्ष होऊन गेली असली तरी राणा दा’चं क्रेझ आजही कायम आहे. अशातच अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच झी मराठीवर कमबॅक करताना दिसणार आहे. एका नव्या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून राणा दा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

झी मराठीवर लवकरच एक नवाकोरा रिऍलिटी शो सुरु होणार आहे. ज्याचं नाव ‘जाऊ बाई गावात’ असे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी पहिल्यांदाच होस्ट करताना दिसणार आहे. ‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्यात या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला गेला. दरम्यान या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना राणादाची झलक पहायला मिळाली. प्रोमो पाहून हा कार्यक्रम गावाकडच्या पारंपारिक संस्कृतीवर आधारित असेल असे वाटत आहे. दरम्यान प्रेक्षक या कार्यक्रमाबाबत अत्यंत उत्सुक आहेत.

अभिनेता हार्दिक जोशींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी त्याने ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतूनदेखील तो अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिवाय येत्या काळात हार्दिक ऐतिहासिक चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.