‘तुम्ही मला माफ…’; हेमांगीने वाढदिवसानंतर ‘या’ कारणासाठी मागितली चाहत्यांची माफी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवीने काल म्हणजेच २६ ऑगस्ट २०२३ रोजी तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते, मित्र मंडळी आणि नेटकरी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. फोटो कोलाज, स्टोरीज, पोस्ट शेअर केलर अनेकांनी हेमांगीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या प्रेमासाठी हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.

या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिलंय, ‘काल तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी msgs, phone calls, Dms केले त्यासाठी मी तुमचे आभार मानते. काहींचे calls मी घेऊ शकले नसेन, msgs वाचू शकले नसेन, reply देऊ शकले नसेन, tags पाहू शकले नसेन, stories remention करू शकले नसेन तर मोठ्या दिलानं तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा करते. कालचा दिवस खरंच तुमच्या शुभेच्छांमुळे खास बनला. असंच प्रेम करत रहा, आशीर्वाद देत रहा! पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद!’

यासोबत हेमांगीने तळटीप देत लिहिलंय कि, ‘वाढदिवस काल म्हणजे २६ ॲागस्टला होता, आज नाही याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी!’ हि पोस्ट शेअर करताना हेमांगीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. सोबत सिल्वर ज्वेलरी आणि केसाचा आंबाडा त्यावर गजरा परिधान केला आहे. वाढदिवसानिमित्त हेमांगीने केलेला हा खास लूक तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे.